जेएनएन, नागपूर. Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या नऊ अड्ड्यावर क्षेपणास्त्र हल्ला भारतीय हवाई सेनेनं केली. यात अनेक दहशतवादी ठार झाले आहेत. या कारवाईच्या निमित्तानं नागपुरात भाजपा कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव केला आहे.
भारताने पाकिस्तानवर केलेला एअर स्ट्राइक हल्ल्यात पाकिस्तानचे अनेक दहशतवादी ठार झालेत, भारताने करारा जवाब दिला अशी भावना व्यक्त करत भारतीय जनता पार्टी च्या कार्यकर्त्यांनी नागपूर येथील भारत माता चौकात आनंदोत्सव साजरा केला. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी पाकिस्तान मुर्दाबाद अशी घोषणाबाजी करत आनंद व्यक्त केला.
देशाचे कणखर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला उत्तर दिलं की जर अशा प्रकारचे हल्ले भारतावर जर केले तर त्याला जसेच्या तसे उत्तर मोदी देतील, अशी भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
म्हणून या प्रकल्पाचे नाव 'सिंदूर'
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी नाशकात प्रतिक्रिया दिली. "पीओके असो वा पाकिस्तान, दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर ऑपरेशन सिंदूर अंतर्गत हल्ला करण्यात आला. दहशतवाद्यांनी आमच्या बहिणींचे सिंदूर पुसून टाकल्याचा बदला म्हणून या प्रकल्पाचे नाव 'सिंदूर' ठेवण्यात आले. लष्कराने अनेक दहशतवादी तळ यशस्वीरित्या उद्ध्वस्त केले आणि त्यांच्या धाडसाचा आम्हाला खूप अभिमान आहे..."