एजन्सी, ठाणे: ठाण्यात मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. जिल्ह्यात एका 65 वर्षीय महिलेवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे, असे एका अधिकाऱ्याने बुधवारी सांगितले.

मंगळवारी भिवंडी तालुक्यात महिलेच्या हत्येप्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.

शेतात आढळला मृतदेह

वृद्ध महिलेचा मृतदेह तिच्या शेतात आढळल्यानंतर पोलिसांना सतर्क करण्यात आले. गणेशपुरी पोलिस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

महिलेच्या गळ्यात अजूनही 5-6 तोळे सोन्याचे दागिने असल्याने चोरीचा हेतू नव्हता, असे अधिकाऱ्याने सांगितले.

बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल

    "एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे आणि त्याच्यावर बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे," असे पोलिस उपअधीक्षक राहुल झाल्टे म्हणाले आणि पुढील चौकशी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.