जेएनएन, मुंबई. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर महिन्याच्या हफ्ता लाडक्या बहिणींच्या (Ladki Bahin Yojana) खात्यात जमा होत आहे. शासनाकडून निधी मंजूर करण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून लाभार्थांच्या खात्या निधी जमा होत आहे. जर तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील तर काय करावे, याबद्दल जाणून घेऊया…
अदिती तटकरे यांची माहिती
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झालेली आहे. लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे, अशी माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली होती.
बँक खाते पडताळणी
अर्ज प्रक्रियेदरम्यान दिलेली बँक खाते माहिती योग्य आहे आणि खाते सक्रिय आहे, याची खात्री करा. खाते क्रमांक किंवा IFSC कोडमध्ये चुकीमुळे पैसे जमा होण्यास विलंब होऊ शकतो.
हेल्पलाईनवर करा संपर्क
योजनेच्या हेल्पलाईन टोल फ्री संपर्क क्रमांक 181 वर संपर्क साधा. हेल्पलाईन कर्मचारी तुमच्या अर्जाची स्थिती तपासून पुढील काय करायचे याबाबत मार्गदर्शन करतील.
स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधा
तुमच्या परिसरातील महिला व बालविकास (WCD) कार्यालयाशी किंवा योजनेचे नोडल अधिकारी यांच्याशी संपर्क साधा. ते तुमच्या अर्जाची स्थितीबद्दल माहिती देऊ शकतात.
अधिकृत वेबसाइटला भेट द्या
महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाइटला किंवा लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलला भेट द्या. तिथे देण्यात आलेल्या अद्यतने आणि सूचना तपासा.
eKYC करणे अनिवार्य
राज्यातील महिलांना आर्थिकदृष्टा मजबूत करण्यासाठी राज्यात सरकारने "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजना (Ladki Bahin Yojana) सुरु करण्यात आली. या योजनाची सुरुवात ही 28 जून 2024 रोजी झाली होती. या योजनेमार्फत महाराष्ट्रातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिना रु. 1500/- असा आर्थिक लाभ DBT द्वारे देण्यात येत आहे. जवळपास अडीच कोटी महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. या महिलांना eKYC करणे अनिवार्य आहे.
