एजन्सी, नवी दिल्ली. केंद्र सरकारने शनिवारी देशातील विविध उच्च न्यायालयांमध्ये आठ मुख्य न्यायमूर्ती नियुक्त केले आहेत. या नियुक्त्या सर्वोच्च न्यायालय कॉलेजियमच्या शिफारशीच्या काही दिवसांनंतर झाल्या आहेत.
कायदेमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी ‘एक्स’ (X) वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, अलाहाबाद हायकोर्टातील जस्टिस महेश चंद्र त्रिपाठी हे बॉम्बे हायकोर्टाचे चीफ जस्टिस असतील. दिल्ली उच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायाधीश वल्लुरी कामेश्वर राव यांची पटना उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रवींद्र व्ही. घुगे हे कलकत्ता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती असतील.
नियुक्त केलेले आठ मुख्य न्यायधीश
जस्टिस महेश चंद्र त्रिपाठी (अलाहाबाद हायकोर्ट) – बॉम्बे हायकोर्टाचे चीफ जस्टिस
जस्टिस वल्लुरी कामेश्वर राव (दिल्ली हायकोर्ट) – पटना हायकोर्टाचे चीफ जस्टिस
जस्टिस रविंद्र व्ही घुगे (बॉम्बे हायकोर्ट) – कलकत्ता हायकोर्टाचे चीफ जस्टिस
जस्टिस संजय कुमार अग्रवाल (छत्तीसगड हायकोर्ट) – राजस्थान हायकोर्टाचे चीफ जस्टिस
जस्टिस अश्विनी कुमार मिश्रा (पंजाब आणि हरियाणा हायकोर्ट) – पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाचे चीफ जस्टिस
जस्टिस कृष्णा राम मोहापात्रा (ओडिशा हायकोर्ट) – छत्तीसगड हायकोर्टाचे चीफ जस्टिस
जस्टिस अल्पेश यशवंत कोग्जे (गुजरात हायकोर्ट) – मध्य प्रदेश हायकोर्टाचे चीफ जस्टिस
जस्टिस पुष्पेंद्र सिंह भाटी (राजस्थान हायकोर्ट) – जम्मू-काश्मीर आणि लडाख हायकोर्टाचे चीफ जस्टिस
