जेएनएन, मुंबई: आगामी स्थानिक आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आणि खोट्या नावांची नोंद झाल्याचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचा उद्या मोर्चा आहे. मोर्चासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनाने पूर्ण तयारी केली आहे. माविआ आपल्या मित्र पक्षासोबत खोट्या मतदार याद्यांचा लेखाजोखा मोर्चात मांडणार आहे.माविआ राज्य निवडणूक आयोगावर मतदार यादीत बनावट नावे आणि डुप्लिकेट मतदारांच्या नोंदीविरोधात निष्काळजीपणा केल्याचा आरोप केला आहे.

माहितीनुसार, हा मोर्चा महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर काढण्यात येणार आहे. माविआ नेते म्हणाले की, “अनेक मतदार यादींमध्ये मृत व्यक्तींची नावे आहेत, काही मतदारांचे पत्ते चुकीचे आहेत, तर काही मतदार एकाच मतदारसंघात दोन ठिकाणी नोंदवले गेले आहेत. हे सर्व लोकशाही प्रक्रियेवर गदा आणणारा आहे.”

शिवसेनाने “मतदार यादी शुद्ध करा, लोकशाही वाचवा” या घोषवाक्याखाली हे आंदोलन आयोजित केले आहे. या मोर्चात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ,काँग्रेस शरद पवार गट यांच्यासह वरिष्ठ नेते, आमदार आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. मुंबई पोलिसांकडून या मोर्चासाठी आवश्यक सुरक्षा बंदोबस्त आणि वाहतूक व्यवस्थेबाबत तयारी सुरू करण्यात आली आहे.

हेही वाचा: Raj Thackeray: मुख्यमंत्रीपदासाठी आणखी किती लाचार होणार? नमो टुरिझम सेंटरवरून राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल, उद्धव ठाकरेंसोबतच्या भेटींवरही भाष्य