जेएनएन, मुंबई: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकारणात सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र येण्याबाबतचा निर्णय उद्या शरद पवार गटाच्या वर्धापन दिनी होणार असल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. वर्धापनच्या दिवशी कार्यकर्ताच्या मनातील निर्णय शरद पवार घेणार असल्याची माहिती सुळे यांनी दिली आहे. 

शरद पवार यांच्या गटाचा उद्या वर्धापन दिन पुणे येथे साजरा होणार असून त्याआधीच शरद पवार आणि अजित पवार एकाच व्यासपीठवर येत आहे. पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे होणाऱ्या कार्यक्रमाला दोन्ही नेते उपस्थित राहणार आहेत.वर्धापन दिनच्या एक दिवस आधीच दोन्ही नेते एकत्र येत असल्याने कार्यकर्ताच्या नजरा कार्यक्रमकडे लागले आहे.कार्यक्रम निमित्ताने दोन्ही नेते एकत्र येण्यावर चर्चा करू शकतात अशी शक्यता वर्तविली जात आहे.तर दुसरीकडे शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत सूचक विधान केले आहे. 

वर्धापन दिनी शरद पवार कार्यकर्ता यांच्याशी चर्चा करून कार्यकर्ताच्या मनातील निर्णय घेतील असे विधान सुळे यांनी केले आहे. यामुळे शरद पवार गटाच्या वर्धापन दिनकडे सर्व राजकीय नेत्यांचे लक्ष लागले आहे. शरद पवार वर्धापन दिनी नेमकी कोणती भूमिका मांडतात याकडे पक्षाच्या कार्यकर्ताचा लक्ष लागला आहे.