BMC Election 2026: सर्वोच्च न्यायालयाने 2022 पूर्वीच्या परिस्थितीनुसार निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून मुंबई महानगरपालिकेसह सर्व पालिकांच्या निवडणुका घेण्याची घोषणा केली आहे. राज्यातील महापालिकेसाठी यंदा 15 जानेवारी 2026 रोजी मतदान आणि 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. (Mahanagarpalika election Date)
Municipal Election 2026 राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा झाल्याने सर्व राजकीय पक्ष पूर्ण ताकदीने मैदानात उतरले आहेत. त्यामुळे भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना, शिवसेना ठाकरे गट, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षासह सर्व पक्ष आपल्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारात रिंगणात उतरले आहे. आता मतदानाला अवघे 8 दिवस बाकी असल्याने राजकीय पक्षांकडून सभांचा धडाका सुरु आहे. चला या सगळ्या बातम्यांची क्षणाक्षणांची अपडेट घेत राहू….
- 2026-01-08 20:09:53
विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवू - एकनाथ शिंदे
2026 च्या बीएमसी निवडणुकीबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "नवी मुंबईत निवडणूक प्रचार खूप वेगाने सुरू आहे. लोकांमध्ये उत्साह आहे. लोकांना बदल हवा आहे. अनेक वर्षांपासून ज्या सुविधा पुरवल्या जायला हव्या होत्या, त्या मिळाल्या नाहीत आणि एकनाथ शिंदे यांनी ते काम पूर्ण केले आहे. येथील पुनर्विकासाचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे आणि शिवसेना तो सोडवण्यासाठी काम करेल. येथे आपण पाहत आहोत की अंतर्गत रस्त्यांची अवस्था खराब आहे. शिवसेना हे काम हाती घेईल. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवू." - 2026-01-08 18:22:51
अंबरनाथमधील 12 नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी काँग्रेस कायदेशीर कारवाई करणार
अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या 12 नगरसेवकांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. सदर प्रकार हा पूर्णपणे बेकायदेशीर असून या सर्व 12 नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी काँग्रेस पक्ष कायदेशीर कारवाई करणार आहे. स्वतंत्र गट स्थापन करणे किंवा नंतर दुसऱ्या पक्षात प्रवेश करणे हे अनैतिक तर आहेच पण असंवैधानिकही आहे. लवकरच या सर्वांना कायदेशीर नोटीसा बजावण्यात येतील, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिली आहे. - 2026-01-08 18:25:19
काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची रविंद्र चव्हाणांवर टीका
"भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी विलासराव यांच्या स्मृती पुसल्या गेल्या आहेत, असं म्हटलं आहे. हे त्यांच्या मानसिकतेचे दर्शन घडवते..." असं जालन्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.Jalna, Maharashtra: Congress State President Harshwardhan Sapkal says, "The state president of BJP has said that all the names of Vilasrao’s associates must be removed. This reflects their mindset..." pic.twitter.com/bhhdcViOr4
— IANS (@ians_india) January 8, 2026 - 2026-01-08 17:00:38
राज ठाकरेंच्या हस्ते कल्याण पश्चिममधील मनसे कार्यालयाचे उद्घाटन
मनसे अध्यक्ष राज ठाकरे कल्याणमध्ये दाखल झाले आहेत. त्यांच्या हस्ते कल्याण पश्चिम येथील नव्याने स्थापन झालेल्या मनसे कार्यालयाचे उद्घाटन केले.Kalyan, Maharashtra: MNS chief Raj Thackeray arrives in Kalyan. He will inaugurate the newly established MNS office in Kalyan West pic.twitter.com/0SCyF8KSKW
— IANS (@ians_india) January 8, 2026 - 2026-01-08 16:57:14
वारिस पठाण यांनी आधी संविधान अधिक महत्त्वाचे आहे की कुराण? हे सांगावे - नितेश राणे
एआयएमआयएम नेते वारिस पठाण यांच्या विधानावर मंत्री नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "वारिस पठाण यांनी आधी मला या प्रश्नाचे उत्तर द्यावे की, त्यांच्यासाठी संविधान अधिक महत्त्वाचे आहे की कुराण? माझ्या मते, मुस्लिम समुदाय कुराणानुसार आपले जीवन जगतो, बरोबर? त्यामुळे जर आपण त्यांच्यासमोर संविधान आणि कुराण ठेवले, तर त्यांनी आधी सांगावे की त्यांच्यासाठी अधिक महत्त्वाचे काय आहे." असं राणे म्हणाले.Mumbai, Maharashtra: On AIMIM leader Waris Pathan’s statement, Minister Nitesh Rane says, "Waris Pathan should have first given me this answer: for them, is the Constitution more important or the Quran? In my view, the Muslim community lives their life according to the Quran,… pic.twitter.com/CKXTPl0gEF
— IANS (@ians_india) January 8, 2026 - 2026-01-08 15:31:24
Pune News: मुरलीधर मोहोळ यांचा प्रचार दौरा
रविवार पेठ-नानापेठ या प्रभाग क्रमांक 23 मध्ये भारतीय जनता पार्टी-आरपीआय (A) च्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आज केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रचार दौरा केला. यावेळी प्रचार फेरीदरम्यान विविध समाजघटकांनी उत्स्फूर्तपणे केलेलं स्वागत स्विकारलं. यावेळी माझ्यासमवेत आमदार सुनीलभाऊ कांबळे आणि आमदार हेमंतभाऊ रासने यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. - 2026-01-08 15:24:20
pune municipal corporation election 2026: गरीब महिलांना दरमहा 2,500 रुपये देणार
राज्य सरकारच्या 'लाडकी बहीन योजने'अंतर्गत गरीब महिलांना दरमहा 2,500 रुपये आणि 500 चौरस फुटांपेक्षा कमी क्षेत्रफळाच्या घरांसाठी आणि फ्लॅटसाठी मालमत्ता कर माफ करण्याचे आश्वासन भाजपाने पुण्यातील संकल्पपत्रात दिलं आहे. सविस्तर वाचा- - 2026-01-08 14:56:09
Sandeep Deshpande: मी कुठेही जात नाहीये - संदीप देशपांडे
भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या अटकळांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे म्हणाले, "मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत आहे आणि पक्षाच्या मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत आहे. आम्ही निवडणुका लढवत आहोत, पक्षाच्या उमेदवारांसोबत काम करत आहोत आणि जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. कोणतीही अडचण नाही आणि मी कुठेही जात नाहीये."Mumbai, Maharashtra: On speculation of joining the BJP, Maharashtra Navnirman Sena leader Sandeep Deshpande says, "I am in Maharashtra Navnirman Sena serving as Mumbai president for the party. We are contesting elections, working with party candidates, trying our best to win as… pic.twitter.com/ZqSPPx431n
— IANS (@ians_india) January 8, 2026 - 2026-01-08 14:53:56
किरीट सोमैया यांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
"उद्धव ठाकरे यांनी नील सोमैया यांच्या विरोधात काही गुंडांना पाठिंबा दिला. आता, दिनेश धाडव यांच्यावर मारहाण करणे, हातपाय तोडणे आणि हत्येचा प्रयत्न करणे या आरोपांखाली एफआयआर दाखल आहेत. दिनेश धाडव यांनी ही माहिती आपल्या उमेदवारी अर्जात उघड केली नाही आणि खोटे प्रतिज्ञापत्र दाखल केले..." असं भाजप नेते किरीट सोमैया म्हणाले.Mumbai, Maharashtra: BJP leader Kirit Somaiya says, "Uddhav Thackeray supported some goons against Neil Somaiya. Now, in the case of Dinesh Dhadhav, there are FIRs registered for assault, breaking limbs and attempting murder. Dinesh Dhadhav did not disclose this information in… pic.twitter.com/DOTeg3PdhC
— IANS (@ians_india) January 8, 2026 - 2026-01-08 13:13:04
Thackeray Bandhu:शिवतीर्थावर दिसणार, शिवशक्तीची ताकद! ठाकरे बंधूंच्या सभेचा टिझर जारी
ठाकरे बंधूंच्या 'शिवतीर्थ'वरील संयुक्त सभेचा पहिला टिझर समोर आला आहे. शिवतीर्थावर दिसणार, शिवशक्तीची ताकद! ठाकरे येताहेत... 11 जानेवारी 2026 रोजी शिवतीर्थावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची एकत्र सभा होणार आहे.शिवतीर्थावर दिसणार, शिवशक्तीची ताकद!
ठाकरे येताहेत... ११ जानेवारी २०२६ रोजी pic.twitter.com/ioHJBpfuZK — ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) January 8, 2026 - 2026-01-08 13:13:01
शिंदेसेना उमेदवाराच्या पोटात खुपसला चाकू
वांद्रे पश्चिमेच्या ज्ञानेश्वरनगरमध्ये शिंदेसेनेचे उमेदवार हाजी सलीम कुरेशी यांच्यावर बुधवारी प्रचार करीत असताना अनोळखी हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. कुरेशी हे वॉर्ड क्रमांक 92 मधून शिंदेसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. हल्ल्यात त्यांच्या पोटाला गंभीर दुखापत झाली आहे. कुरेशी यांना महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त दीक्षित गेडाम यांनी दिली सांगितले. - 2026-01-08 12:11:27
भाजप एमआयएम किंवा काँग्रेससोबत युती करू शकते तर... संजय राऊतांची खोचक टीका
शिवसेना (यूबीटी) खासदार संजय राऊत म्हणाले, “जर भाजप एआयएमआयएम किंवा काँग्रेससोबत युती करू शकत असेल, तर महाराष्ट्र राजकारणात भाजप किंवा शिवसेना (शिंदे गट) यांच्यासाठी काहीही अशक्य नाही.”VIDEO | Mumbai: Shiv Sena (UBT) MP Sanjay Raut says, “If the BJP can ally with AIMIM or Congress, then nothing is impossible for the BJP or the Shiv Sena (Shinde faction) in Maharashtra politics.” (Full video available on https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/cUweAeN4gz
— Press Trust of India (@PTI_News) January 8, 2026
