जेएनएन, मुंबई. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाराष्ट्रात सुरु झाल्या आहेत. येत्या काही दिवसांत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर होऊ शकते. त्यापूर्वी शिवसेना उद्धव ठाकरे आणि मनसेला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवर (Vijay Wadettiwar) यांनी मोठी घोषणा केली आहे.
मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय
“आमच्या स्थानिक नेत्यांनी मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे मनसेबरोबर जाण्याचा आता तरी कोणताही विचार किंवा प्रस्ताव नाही, हे स्पष्ट आहे, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
ते प्रश्न घेऊन आम्ही निवडणुकीला समोरं जाऊ
मुंबई महापालिकेची तिजोरी खाली झाली आहे. मुंबईत भ्रष्ट्राचाराचे प्रकरणे खूप आहेत. खिरापत वाटली जात आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही जे आवश्यक प्रश्न आहेत, ते प्रश्न घेऊन आम्ही निवडणुकीला समोरं जाऊ”, असं विजय वडेट्टीवार यांनी आज माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
#LIVE : पत्रकार परिषद l नागपूर https://t.co/mZSfvir0Yv
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) November 10, 2025
दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वी, मुंबई महानगर पालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. आम्ही ना उद्धव ठाकरे यांच्यासोबत, ना राज ठाकरे यांच्यासोबत जाणार अशी भूमिका भाई जगताप यांनी मांडली आहे.
