जेएनएन, मुंबई: बिहार विधानसभा निवडणूक 2025 (Bihar Election Result 2025) मध्ये एनडीएला पूर्ण बहुमत मिळत असल्याचे दिसत आहे. या विजयाचा जल्लोष महाराष्ट्राहती भाजपा कार्यकर्ते साजरा करताना दिसत आहेत. बिहारमध्ये निकाल एनडीएच्या बाजूने झुकताच मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक यांसह राज्यातील भाजप कार्यालयांमध्ये ढोल ताशांच्या निनादात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास
भाजप कार्यकर्त्यांनी “बिहार चुनाव तो झांकी है, BMC बाकी है!” अशी घोषणा देत मुंबई महापालिका निवडणुकांकडे आता लक्ष केंद्रित केले आहे. बिहारमधील होणारा विजय हा महापालिका निवडणुकांसाठी शुभ संकेत असल्याचा आत्मविश्वास कार्यकर्त्यांमध्ये दिसून आला.
भाजप कार्यालयांमध्ये फटाके फोडण्यात आले
मुंबईतील भाजप कार्यालयांमध्ये फटाके फोडण्यात आले, मिठाई वाटण्यात आली आणि पेटे, ढोल यांच्या गजरात उत्सव साजरा करण्यात आला. बिहारच्या विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा संचारल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंद
बिहारमध्ये एनडीएला मिळालेल्या स्पष्ट बहुमताच्या कलामुळे देशभरात भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्रातही या विजयाचा जल्लोष मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे.
