जेएनएन, मुंबई: सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अशोक खरात प्रकरणात मोठे आणि खळबळजनक आरोप केले आहे. अनेक नेते आणि मंत्र्यांचे अशोक खरात यांच्यासोबत झालेले कथित कॉल रेकॉर्ड्स (CDR) समोर आणत दमानिया यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

 काय आहेत दमानियांचे आरोप?

अशोक खरात यांच्या कॉल डिटेल रेकॉर्ड्सचा (CDR) उल्लेख करत दमानिया म्हणाल्या की,

• रूपाली चाकणकर यांनी खरात यांना तब्बल 177 कॉल्स केले.

• प्रतिभा चाकणकर यांचे 236 कॉल्स झाले असल्याचा दावा.

• एकनाथ शिंदे यांचे 17 कॉल्स (10 इनकमिंग, 7 आउटगोइंग), साधारण 21 मिनिटे संभाषण.

    • चंद्रकांत पाटील यांचेही कॉल्स झाल्याचा आरोप.

    • सुनील तटकरे यांचे 8 कॉल्स.

    • आशिष शेलार यांचा 1 कॉल झाल्याचा दावा दमानिया यांनी केला आहे. 

    कॉल कालावधी कोणता?

    दमानिया यांच्यानुसार, 1 एप्रिल 2025 ते 17 मार्च 2026 या कालावधीतील कॉल रेकॉर्ड्स त्यांच्या हाती लागले आहेत.

     आरोपांमुळे राजकीय खळबळ
    या आरोपांमुळे राज्यातील अनेक मोठ्या नेत्यांची नावं एकाच वेळी चर्चेत आली आहेत. विशेष म्हणजे विविध पक्षांतील नेत्यांचा यात उल्लेख असल्याने हा मुद्दा केवळ एका पक्षापुरता मर्यादित राहिला नाही.

    सत्यता आणि पुढील कारवाई?
    हे सर्व आरोप दमानियांनी केले असून, संबंधित नेत्यांकडून अद्याप अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही. त्यामुळे या कॉल रेकॉर्ड्सची सत्यता, त्यामागील संदर्भ आणि कायदेशीर पडताळणी महत्त्वाची ठरणार आहे.

    हेही वाचा: अशोक खरात प्रकरणात धक्कादायक खुलासा: 100 हून अधिक खात्यांमध्ये नॉमिनी, ‘चाकणकर’ नावावरून खळबळ