जेएनएन, मुंबई: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा होती.मात्र ती चर्चा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनी मावळली. आज पुणे येथील कार्यक्रमात शरद पवार दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच मनोमिलन होणार नाही. अजित पवार यांना शरद पवार यांनी संधीसाधू'पणाची उपमा दिली आहे. पक्षात संधीसाधू'पणाचं राजकारण आणायचं नाही असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.

भाजपसोबत गेलेल्यांना सोबत घेणार नाही, असे त्यांनी ठामपणे शरद पवार यांनी सांगितले.शरद पवार आणि अजित पवार अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले त्यामुळे दोन्ही पक्ष एकत्र येतील अशी चर्चा सुरू होती.त्याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी कार्यकर्ता समोर पुणे येथे स्पष्ट भूमिका मांडली आहे.

पक्षात संधीसाधू'पणाला स्थान नाही यामुळे दोन्ही पक्षाचं मनोमिलन होणार नाही अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली.शरद पवार यांनी अजित पवारांचा उल्लेख टाळला. मात्र शरद पवार यांचा सगळा रोख अप्रत्यक्षपणे अजित पवारांकडेच होता. 'संधीसाधू'पणाचं राजकारण आपल्याला प्रोत्साहित करायचं नाही अशी भूमिका शरद पवार पिंपरी-चिंचवडमध्ये मांडली आहे.