जेएनएन/एजन्सी, मुंबई. Air India Plane: सोमवारी सकाळी कोचीहून मुंबई विमानतळावर उतरताना एअर इंडियाचे विमान (Air India Plane) धावपट्टीवरून घसरले, अशी माहिती पीटीआयने दिली आहे.  तपासणीसाठी विमानाला ग्राउंड करण्यात आले आहे. विमान कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, विमान सुरक्षितपणे उतरले आणि सर्व प्रवासी तसेच क्रू मेंबर्स उतरले आहेत.

कोचीहून मुंबईला आलेले एअर इंडियाचे विमान आज सकाळी मुंबई विमानतळावर उतरताना धावपट्टीवरून घसरले. विमान A1- 2744 फ्लाइट नंबर कोचीहून मुंबईला खाली उतरत असताना ही घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे.  प्राथमिक माहितीनुसार, लँडिंगदरम्यान विमान रनवेवरून पुढे गेले, अशी माहिती समोर आली आहे. 

या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप नाही. विमानातील प्रवासी आणि क्रू सर्व सुरक्षित असल्याचे सांगितले जात आहे. या अपघातानंतर मुंबई विमानतळावरील काही वेळासाठी उड्डाण आणि लँडिंगच्या वेळापत्रकावर परिणाम झाला.  विमान का घसरले, याचा तपास सुरू असून हवामानाच्या स्थितीचाही अभ्यास केला जात आहे अशी माहिती  विमान प्राधिकरण कडून देण्यात आली आहे. 

"21 जुलै 2025 रोजी कोचीहून मुंबईला जाणारे विमान AI27244, लँडिंग दरम्यान मुसळधार पाऊस पडला, ज्यामुळे लँडिंगनंतर धावपट्टीवर ही घटना घडली. "विमान सुरक्षितपणे गेटवर पोहोचले आणि सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स उतरले आहेत," असे प्रवक्त्यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

सूत्रांनी सांगितले की, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (डीजीसीए) एक पथक परिस्थितीचा आढावा घेत आहे. "विमान तपासणीसाठी ग्राउंड करण्यात आले आहे. "प्रवाशांची आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे," असे प्रवक्त्याने सांगितले.