जेएनएन, मुंबई. Local Body Election Maharashtra: राज्यातील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. राज्यातील महापालिका आणि नगरपालिकांच्या प्रभाग रचनेला सुरुवात झाली असून याबाबतचा कार्यक्रम नगरविकास विभागाने जाहीर केला. नगरविकास विभागानुसार सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रभाग रचना पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे निवडणूक नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत महिन्यात होऊ शकते.

नगरविकास विभागानुसार 9 टप्प्यांत प्रभाग रचनेची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. राज्य निवडणूक आयुक्तांकडून मुंबई महापालिकासाठी अंतिम प्रभाग रचना 29 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरदरम्यान जाहीर करणार आहे. 

अ, ब आणि क दर्जाच्या महापालिकांची अंतिम प्रभाग रचना ही 29 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरदरम्यान जाहीर केले जाणार आहे. ड दर्जाच्या महापालिकांची अंतिम प्रभाग रचना 22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबरदरम्यान जाहीर केले जाणार आहे. नगर परिषद आणि नगरपंचायतींची अंतिम प्रभाग रचना ही राज्य निवडणूक आयुक्त 22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबरदरम्यान जाहीर करणार आहे. 

प्रभाग रचना नंतर प्रभागांचे आरक्षण जाहीर केले जाणार आहे. त्यानंतर प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे महापालिका व नगरपालिकांची निवडणूक नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे.

असे आहेत प्रभाग रचनाचे टप्पे!

  • प्रभाग रचनेचा प्रारूप तयार करून प्रभाग रचनेचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाकडे अहवालसाठी पाठविणे. 
  • तयार झालेली प्रभाग रचना प्रसिद्ध करून त्यावर हरकती, सूचना मागवून जिल्हाधिकारी किंवा प्राधिकृत अधिकारीकडून मिळालेल्या हरकतीवर सुनावणी करणे.
  • सूचना आणि सुनावणीनंतर अंतिम प्रभाग रचनासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी पाठविणे. त्यानंतर राज्य निवडणूक आयुक्तांकडून अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना काढून प्रसिद्ध करणे आहे.

हेही वाचा - पंतप्रधान मोदींनी अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलला भेट देऊन जखमींची केली विचारपूस