जेएनएन, मुंबई: महाविकास आघाडी (मविआ) आणि मनसे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) नेत्यांची आज मुंबईत झालेली महत्त्वाची बैठक संपली.बैठकीत 1 नोव्हेंबरला होणाऱ्या मोर्चाच्या नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट,उद्धव ठाकरे सोबत पहिल्यांदाच राज ठाकरे एकत्र येणार आहे.

ठाकरे बंधूंसह प्रमुख नेते उपस्थित

या बैठकीला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड, काँग्रेस नेते सचिन सावंत, नसीम खान आणि शशिकांत शिंदे उपस्थित होते.

 मोर्च्याचा नियोजन

  • 1 नोव्हेंबर निर्णायक ठरणार!
  • या बैठकीत प्रामुख्याने 1 नोव्हेंबरच्या मोर्च्याचं नियोजन, मार्ग, परवानगी आणि सुरक्षा व्यवस्थेवर चर्चा झाली.
  • मोर्च्याचं ठिकाण आणि घोषवाक्य निश्चित करण्यासंदर्भातही प्राथमिक सहमती झाली आहे.