जेएनएन, नागपूर: प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कडू यांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेल्या भव्य मोर्चानं नागपूर–वर्धा महामार्ग रोखून धरला, आणि त्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष या आंदोलनाकडे वेधलं गेलं आहे.

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी महामार्गावरून मैदानाकडे वळण
महाराष्ट्र सरकारमधील दोन्ही मंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर बच्चू कडू यांनी आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचं मान्य केलं आहे. या भेटीत शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यावर चर्चा करण्यात येणार आहे. यामध्ये कर्जमाफी,
पिक विमा भरपाई,
विजदर कमी करणे,वीज कनेक्शन तोडणी थांबवणे,शेतीमालाला हमीभाव,
या सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे.

महामार्गावर शेतकऱ्यांचा तुफान मोर्चा
बुधवारी सकाळपासून नागपूर–वर्धा महामार्गावर हजारो शेतकरी एकत्र जमले होते. ‘शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे’, ‘कर्जमाफी द्या नाहीतर दिल्लीकडे मोर्चा’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. प्रहार कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी महामार्ग अडवला आणि पोलिस प्रशासनाला देखील तातडीने हालचाल करावी लागली आहे.

हेही वाचा:शेतकरी आंदोलन आता महामार्गाऐवजी मैदानात... आंदोलनातील नेते आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी भेट घेणार