एजन्सी, पुणे. Milk Rate Hike:  प्रमुख सहकारी आणि खासगी डेअरींच्या प्रतिनिधींनी दरवाढीला मंजुरी दिल्यानंतर, महाराष्ट्रात मंगळवार म्हणजेच आजपासून गाय आणि म्हशीच्या दुधाच्या दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ करण्यात येत आहे.

दूध उत्पादक संघटनेच्या बैठकीत निर्णय 

दूध उत्पादक आणि प्रक्रिया करणारे कल्याण संघटनेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. संघटनेचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के यांनी सभेचे अध्यक्षपद भूषवले.

खर्चात वाढ झाल्याने निर्णय

संघटनेच्या म्हणण्यानुसार, डिझेलच्या दरात प्रति लिटर 10 रुपयांनी वाढ झाली आहे, तर पॅकेजिंग खर्चात सुमारे 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. दुधाच्या खरेदी दरात वाढ झाली असून, त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. 

किती झाली वाढ

    हा वाढता खर्च लक्षात घेता, संघटनेने दुधाच्या विक्री दरात प्रति लिटर 2 रुपयांनी आणि दुग्धजन्य पदार्थांच्या दरात 10 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सुधारित दर 11 ऑगस्ट म्हणजेच आजपासून लागू होणार आहेत.