जेएनएन, मुंबई. राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ऐन भरणीमध्ये आलेल्या पिकांनी माना टाकायला सुरुवात केली आहे. मागील 20 ते 25 दिवसांपासून राज्यात पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे पिके सुकू लागली आहे. त्यातच आता संकट अधिक वाढण्याची शक्यता आहे. कारण, आयएमडीच्या अहवालामध्ये पुढील चार दिवसात राज्यात पावसाचा कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही.

हवामान विभागाच्या मुंबई केंद्राने राज्यातील हवामानाचा अंदाज व्यक्त केला आहे. यामध्ये राज्यात पुढील चार दिवसांत कोणत्याही पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही. काही ठिकाणी हलक्या ते सरी तुरळक कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

महाराष्ट्रातून पाऊस गायब

IMD ने जारी केलेल्या हवामान अहवालानुसार राज्यात पुढील चार दिवसांत पावसाची शक्यता खूप कमी आहे. ऑगस्टमध्ये खूप कमी पाऊस झाला आणि आता सप्टेंबरचे दोन आठवडे उलटले तरी चांगल्या पावसाची शेतकऱ्यांना प्रतिक्षा आहेत. शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. आकाशात नुसती ढगांची गर्दी होत आहे. मात्र, पाऊस काही कोसळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची खरीप पिके धोक्यात आली आहेत.

मुंबईत कसे राहिल हवामान

मुंबई शहर आणि उपनगरात आज हलक्या पावसासह आकाश अंशतः ढगाळ राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 32 अंश सेल्सिअस आणि 26 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. 

    सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी - फडणवीस

    मंत्रिमंडळाच्या बैठकीत या मुद्द्यावर जिल्हावार सादरीकरणासह सुमारे 45 मिनिटे चर्चा झाली, असे सांगून ते म्हणाले की, संभाव्य टंचाई आणि दुष्काळसदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी सरकारने तयारी सुरू केली आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीच्या (NDRF) निकषानुसार, दुष्काळ किंवा टंचाईच्या परिस्थितीत मदतीसाठी पात्रता ठरवण्यासाठी अधिकृत पाहणी/सर्व्हे 5 ऑक्टोबरनंतर करावा लागतो, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.  "पण आम्ही 5 ऑक्टोबरपर्यंत वाट पाहत नाही आहोत. आम्ही प्राथमिक माहिती गोळा करण्यास आणि इतर उपायांची तयारी करण्यास सुरुवात केली आहे," असे ते म्हणाले. राज्य सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील," असे आश्वासन त्यांनी दिले.