जेएनएन, मुंबई. राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्यात आज आणि उद्या अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. IMD ने दक्षिण कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस/मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
दक्षिण कोकण-गोवा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 40-50 किमी वेगाचे वादळी वारे वाहण्याची दाट शक्यता आहे.
आज या भागात पावसाचा अलर्ट
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नाशिक घाट, अहिल्यानगर, पुणे घाट, पुणे, कोल्हापूर, कोल्हापूर घाट, सातारा, सातारा घाट, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे आणि हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा (30 -40 किमी प्रतितास) येण्याची शक्यता आहे.
उद्या या भागात पावसाचा अलर्ट
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाट, पुणे, कोल्हापूर, कोल्हापूर घाट, सातारा, सातारा घाट, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, चंद्रपूर, यवतमाळ या भागात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे आणि हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा (30 -40 किमी प्रतितास) येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे.

मुंबईत हलक्या पावसाची शक्यता (Mumbai Rain Update)
मुंबईत आकाश अंशतः ढगाळ राहील आणि शहरात व उपनगरांमध्ये हलक्या ते मध्यम पाऊस पावसाच्या सरी कोसण्याची शक्यता आहे. शहरात कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 33 अंश सेल्सिअस आणि 26 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
