जेएनएन, मुंबई. Yellow Alert in Maharashtra: मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्रात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 30-40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने दांडी मारली होती. आता पुन्हा पावसासाठी चांगले वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. राज्यातील विदर्भासह डोंगरमाथा आणि मराठवाडा, विदर्भात काही भागात पावसाची स्थिती निर्माण झाली आहे.
या जिल्ह्यांत अलर्ट
राज्यात IMD कडून काही भागांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाट, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाट, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशीव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट दिला आहे.
उद्याही पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाट, सातारा, सातारा घाट, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली परिसरात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. तर धुळे, नंदुरबार, नाशिक घाट या भागात IMD Mumbai कडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबई हवामान अंदाज (Mumbai Weather Update)
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पावसाचा अंदाज आहे. IMD कडून मुंबईत आज आणि उद्या पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 31 अंश सेल्सिअस आणि 26 अंशसेल्सि असे राहण्याची शक्यता IMD Mumbai ने व्यक्त केली आहे.
