जेएनएन, मुंबई. राज्यात मागील काही दिवसांपासून ऑक्टोबर हीटचा परिणाम वाढला आहे. त्यामुळे राज्यात अनेक जिल्ह्यात उष्णतेचा अलर्टही जारी करण्यात आला होता. मात्र, आता हवामान बदल झाला असून राज्यात पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

10 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट

राज्यातील 10 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट IMD कडून देण्यात आला आहे. येत्या 24 राज्यात राज्यात पावसाचे वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, कोल्हापूर घाट, सातारा घाट, सांगली, सोलापूर, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशीव या जिल्ह्यांत पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. तुरळक ठिकाणी ठिजांच्या कडकडाटासह वादळे, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास) येण्याची शक्यता आहे.

उद्या या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज (Maharashtra Weather Update 19 October)

IMD उद्या म्हणजेच 19 ऑक्टोबर रोजी तुरळक ठिकाणी ठिजांच्या कडकडाटासह वादळे, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास) येण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पुणे, पुणे घाट, कोल्हापूर, कोल्हापूर घाट, सातारा, सातारा घाट, सांगली, सोलापूर, बीड, लातूर, धाराशीव, गडचिरोली, नागपूर जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.