जेएनएन, मुंबई. Maharashtra Rainfall Reports: राज्यात जुलै महिन्यानंतर चांगला जोरदार पाऊस झालाच नाही. अनेक शहरी भागात पावसाने जोर दाखवला मात्र ग्रामीण महाराष्ट्रात सर्वत्र रिपरिपच सुरु होती. यातच आता मागील 15 ते 20 दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील भीषणता अधिकच वाढली आहे. राज्यात पावसाची मोठी तूट निर्माण झाली आहे.
राज्यात मान्सूनमध्ये 18.7 टक्के पावसाची तूट
राज्यात जून महिन्यापासून आज 16 सप्टेंबर पर्यंत झालेल्या पाऊस हा 748.6 MM आहे. मात्र, सरासरी महाराष्ट्रात आजच्या तारखेपर्यंत पाऊस हा 920.3 मिमी होत असतो. मात्र, विविध कारणामुळे यंदा पावसाचे प्रमाण खूप कमी राहिले आहे. आतापर्यंत मान्सूनमध्ये 18.7 टक्के पावसाची तूट आढळली आहे.
सप्टेंबरमध्ये 49.7 टक्के पावसाची तूट
राज्यात सप्टेंबर महिन्यात अधिकच भीषण आकडेवारी समोर आली आहे. सप्टेंबरमध्ये राज्यात आजतारखेला साधारण 95.8 कोसळतो. मात्र, यंदा केवळ 47.6 मिमी पाऊस कोसळला आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात आजपर्यंत 49.7 टक्के पावसाची तूट समोर आली आहे.
मराठवाड्यात सर्वात कमी पाऊस
विभागनिहाय माहिती पाहिल्यानंंतर असे लक्षात येते की, सर्वात कमी पाऊस हा मराठवाडा म्हणजेच छत्रपती संभाजीनगर विभागात झाला आहे. त्यानंतर पुणे विभागात पावसाची तूट नोंदवण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वसाधारण जून पासून आजपर्यंत (16 सप्टेंबर) 602.0 मिमी पावसाची शक्यता असतो. मात्र यंदा केवळ 407.0 मिमी पाऊस विभागात कोसळला आहे. जो 32.4 तूट दर्शवत आहे. त्याचप्रमाणे पुणे विभागात सर्वसाधारण 864.9 मिमी पावसाची शक्यता असते. मात्र यंदा आज 16 सप्टेंबर पर्यंत केवळ 603.8 मिमी पाऊस कोसळला आहे. जो 30.2 टक्कांची तूट दर्शवत आहे.
सप्टेंबरमध्ये सर्व विभागात वाईट स्थिती
सप्टेंबर महिन्यात राज्यात सर्वदूर पाऊस गायब झाला आहे. त्यामुळे सर्व विभागात मोठ्या प्रमाणात पावसाची तूट निर्माण झाली आहे. मागील 15 ते 20 दिवसांपासून पावसाचा मोठा खंड पडला आहे. शासनाच्या महावेध वेबसाईट नुसार, राज्यात सप्टेंबर महिन्यात मागील पंधरा दिवसात 50.3 टक्कांची तूट नोंदवण्यात आली आहे. या दिवसांत राज्यात 47.8 मिमी पाऊस झाला असून सरासरी तो 95.8 मिमी इतका होत असतो.
विभागनिहाय पाहिले असता आकडेवारीवरून असे लक्षात येते की, पुणे विभागात केवळ 18.9 टक्के, छत्रपती संभाजीनगर विभागात 27.1 टक्के, नाशिक विभागात 44.1 टक्के, अमरावती विभागात 60.6 टक्के आणि कोकणात 65.8 टक्के तर नागपूर विभागात सर्वाधिक 84.4 टक्के पाऊस झाला आहे.
शेतकऱ्यांवर मोठं संकट
सप्टेबरमध्ये वाढलेल्या पावसाच्या तुटीमध्ये या भागातील पिके ही धोक्यात गेली आहेत. राज्यावर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. अनेक भागातील शेतकऱ्यांची पिके करपली आहेत. तर काही भागात पिकांनी माना टाकायला सुरुवात केली आहे. पावसाचा खंड असाच राहील तर शेतकऱ्यांवर मोठं संकट येण्याची शक्यता आहे.
| Division | June, 2026 Normal Rainfall | June, 2026 Actual Rainfall | June, 2026 % To Normal | July, 2026 Normal Rainfall | July, 2026 Actual Rainfall | July, 2026 % To Normal | August, 2026 Normal Rainfall | August, 2026 Actual Rainfall | August, 2026 % To Normal | September, 2026 Normal Rainfall | September, 2026 Actual Rainfall | September, 2026 % To Normal | 1st June to 16 September Normal Rainfall | 1st June to 16 September Actual Rainfall | 1st June to 16 September % To Normal |
|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| Konkan | 662.5 | 374.4 | 56.5 | 1063.9 | 1505.1 | 141.5 | 766.3 | 521.1 | 68.0 | 200.3 | 131.8 | 65.8 | 2693.0 | 2532.4 | 94.0 |
| Nasik | 139.7 | 60.6 | 43.4 | 218.5 | 267.4 | 122.4 | 197.4 | 84.6 | 42.9 | 80.8 | 35.6 | 44.1 | 636.4 | 448.2 | 70.4 |
| Pune | 198.6 | 86.1 | 43.4 | 327.2 | 377.3 | 115.3 | 247.5 | 123.1 | 49.7 | 91.6 | 17.3 | 18.9 | 864.9 | 603.8 | 69.8 |
| Chhatrapati Sambhajinagar | 134.0 | 113.0 | 84.3 | 186.2 | 213.5 | 114.7 | 193.3 | 56.5 | 29.2 | 88.5 | 24.0 | 27.1 | 602.0 | 407.0 | 67.6 |
| Amravati | 147.6 | 125.1 | 84.8 | 239.6 | 285.6 | 119.2 | 231.7 | 48.7 | 21.0 | 69.8 | 42.3 | 60.6 | 688.7 | 501.7 | 72.8 |
| Nagpur | 187.1 | 94.1 | 50.3 | 362.3 | 396.0 | 109.3 | 347.8 | 161.4 | 46.4 | 93.5 | 78.9 | 84.4 | 990.7 | 730.4 | 73.7 |
| State Avg | 207.6 | 125.9 | 60.6 | 330.9 | 435.0 | 131.5 | 286.0 | 140.1 | 49.0 | 95.8 | 47.6 | 49.7 | 920.3 | 748.6 | 81.3 |
