एजन्सी, मुंबई: महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यात दोन आठवडे चाललेल्या तपासणी मोहिमेदरम्यान नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर 29 परवाने रद्द केले आणि 71 परवाने निलंबित केले, तसेच 28.52 लाख रुपयांपेक्षा जास्त मूल्याची बेकायदेशीर औषधे आणि कॉस्मॅटिक जप्त केली.

शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या अधिकृत निवेदनानुसार, मोहिमेदरम्यान औषधांची दुकाने, रक्तपेढ्या आणि औषध निर्मिती केंद्रांसह 937 प्रतिष्ठानांची तपासणी करण्यात आली. अनियमितता आढळून आल्याने 450 नोटीस बजावण्यात आल्या. यामध्ये औषध विक्रेत्यांना 382 नोटीस मिळाल्या. 

22 परवाने रद्द

औषधे व सौंदर्यप्रसाधने कायद्याच्या उल्लंघनाप्रकरणी 22 परवाने रद्द आणि 49 परवाने निलंबित करण्यात आले. 

एफडीएने औषध, कॉस्मॅटिक आणि वैद्यकीय उपकरण उत्पादक, रक्त केंद्रे, रक्त साठवणूक केंद्रे आणि औषध चाचणी प्रयोगशाळांचीही पाहणी केली. 

छत्रपती संभाजीनगरमध्ये, प्रशासनाने दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, जे सायकोट्रॉपिक औषध नायट्राझेपमच्या 34 गोळ्यांच्या बेकायदेशीर खरेदी-विक्रीत कथितपणे सहभागी होते.

    पोलिसांनी एनडीपीएस (NDPS) कायदा, 1985 आणि औषधे व सौंदर्यप्रसाधने कायद्यान्वये एफआयआर दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली.