एजन्सी, नांदेड. राज्यातील नांदेड जिल्ह्यात एक मन हेलकावणारी घटना समोर आली आहे. येथील एक 12 वर्षीय मुलगी घरून दुकानावर किराणा सामान घेण्यासाठी जात असताना एका नराधमाने तिला पकडले आणि निर्जन ठिकाणी नेले. तिथे त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोप आहे. या प्रकरणी एका पुरुषाला अटक करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले.

ही कथित घटना 13 सप्टेंबर रोजी घडली, अशी माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेश पुरी यांनी मंगळवारी दिली.

निर्जन ठिकाणी नेऊन लैंगिक अत्याचार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी किराणा सामान आणण्यासाठी जात असताना आरोपी आदिनाथ जाधव (28) याने तिला जबरदस्तीने एका निर्जन ठिकाणी नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. 

घरी परतल्यानंतर मुलीने या अत्याचाराची माहिती तिच्या आईला दिली, ज्यांनी तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

गुन्हा दाखल

    याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यानंतर जाधवला ताब्यात घेण्यात आले, असे सांगून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्याने नमूद केले.