कोल्हापूर. Kolhapur ZP and Panchayat Samiti Result 2026: कोल्हापूर जिल्हा परिषद आणि 12 पंचायत समिती निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. मतमोजणीच्या सुरुवातीपासून कोल्हापूरमध्ये काँग्रेसने आघाडी घेतल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण 68 जागांसाठी आज मतमोजणी होत आहे.
जिल्ह्यातील अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या भादोले जिल्हा परिषद मतदारसंघात काँग्रेसच्या सोनाली सावंत या 1200 मतांनी आघाडीवर आहेत. मतदानाच्या दिवशी सोनाली सावंत यांच्या पतीची जनसुराज्य कार्यकर्त्यांसोबत वादावादी झाल्याने हा मतदारसंघ चर्चेत आला होता. निवडणुकीच्या तोंडावर सोनाली सावंत यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता त्यांनी भादोले मतदारसंघातून निर्यायक आघाडी घेतल्याचे चित्र आहे, अंतिम निकालाबाबत जिल्ह्याचे या मतदारसंघाकडे लक्ष लागले आहे.
कोण आहेत सोनाली सावंत -
सोनाली सांवत यांचे पुणे-बंगळुरू महामार्गावर कोल्हापूर जवळील किणी टोल नाक्यावर हॉटेल सातबारा नावाचे हॉटेल आहे. प्रशस्त जागेत असलेले हे हॉटेल लोकांमध्ये चांगलेच प्रसिद्ध आहे. पतीसोबत सोनाली या हॉटेलमधील ग्राहकांना आपल्या हाताने जेवण वाढतात. त्यातबरोबर सोनाला रिल स्टार म्हणून ही परिचीत आहेत.
शितल फराकटे यांना पराभवाचा धक्का
हसन मुश्रीफ यांच्या कट्टर समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा शितल फराकटे यांनी पक्षाने उमेदवारी डावलताच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता, मात्र त्यांचा बोरवडे जिल्हा परिषद मतदार संघातून पराभव झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीत अनेक मतदारसंघांमध्ये चुरशीचे चित्र पाहायला मिळत असून काही ठिकाणी आघाडी स्पष्ट झाली आहे.
भादोले जिल्हा परिषद मतदार संघातून काँग्रेसच्या सोनाली सावंत विजयी तर
तर पंचायत समिती गणातून काँग्रेसचेच कपिल पाटील विजयी झाले आहेत.
