जेएनएन, मुंबई. MPSC सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार आयएएस अधिकारी सौरभ कटियार यांच्याकडे सोपवला आला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे महेंद्र उत्तमराव हरपाळकर यांची बदली करण्यात आली आहे. त्यांचा प्रतिनियुक्तीचा कालावधी 1 ऑक्टोबर पासून प्रशासकीय कारणास्तव संपुष्टात आला आहे. त्यामुळे त्यांच्या जागी आयएएस अधिकारी सौरभ कटियार यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.

सौरभ कटियार यांच्याकडे सचिवपदाचा अतिरिक्त कारभार

प्रशासकीय अधिकारी सौरभ कटियार यांच्याकडे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. या संदर्भात आज राज्य शासनानं एक परिपत्रक जारी करुन ही माहिती दिली आहे. यापूर्वी या पदावर असलेले महेंद्र हरपाळकर यांचा प्रतिनियुक्तीचा कालावधी 1 ऑक्टोबर 2026 पासून प्रशासकीय कारणामुळे संपुष्टात आणण्यात आल्यानं हा पदभार कटियार यांच्याकडे पुढील आदेशापर्यंत देण्यात आला आहे.

मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्याकडे एमपीएससीच्या सचिवपदाची अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सौरभ कटियार यांनी यापूर्वी देखील या पदाचे अतिरिक्त कामकाज पाहिले आहे. 

MPSC चे अध्यक्ष पद कोणाकडे जाणार?

    तर दुसरीकडे राज्य सरकारने स्थापन केलेल्या चौकशी आयोगाचा अंतिम अहवाल येईपर्यंत एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर असणार आहे. त्यामुळे अध्यक्षपदाचा कारभार आयोगातील विद्यामान सदस्यांपैकी कुणाकडे दिला जाणार याबाबत अनेक चर्चांना उधाण आले आहे. चौकशी आयोगाला या प्रकरणात अंतिम अहवाल देण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. सध्या आयोगामध्ये अभय वाघ, सतीश देशपांडे, राजीव निवतकर, दिलीप पाटील- भुजबळ आणि सतीश वाघोले हे सदस्य आहेत.