नाशिक -स्वयंघोषित 'कॉस्मोलॉजी' तज्ज्ञ आणि भविष्यवेत्ता अशोक खरात याच्या अटकेनंतर त्याच्याबद्दल नवनवीन खुलासे समोर येत आहेत. तपासात असे उघड झाले आहे की, आरोपीने पीडितेला धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला होता. पोलिसांनी खरातकडून महिलांचे 58 आक्षेपार्ह व्हिडिओ देखील जप्त केले आहेत. आरोपी अशोक  खरात 67 वर्षांचा असून तो कॅप्टन या नावाने ओळखला जातो. महिलेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी त्याच्यावर विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहे.

खरातने महिलेला अशा प्रकारे जाळ्यात अडकवले.

पोलिसांच्या माहितीनुसार, खरात हा सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री ईशानेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष आहे. पीडिता पहिल्यांदा 2019 मध्ये एका नातेवाईकासोबत त्याला भेटायला गेली होती. योग्य साथीदार मिळण्यासाठी ती कॅप्टनला भेटायला गेली होती. मात्र, कोविड-१९ महामारीमुळे काही काळ तिचा त्याच्याशी पुन्हा संपर्क होऊ शकला नाही. 2022 मध्ये, जेव्हा तिला लग्नासाठी स्थळ आले तेव्हा ती त्याला भेटायला गेली. यावेळी कॅप्टनने तिला एक लॉकेट दिले. हे लॉकेट देताना कॅप्टनने तिला सांगितले होते की, ते कधीही काढू नकोस, नाहीतर त्यांचे नाते तुटेल.

या काळात, परीक्षेला जाताना तिला हे लॉकेट काढावे लागले. एका आठवड्यातच तिचा विवाह मोडला. यामुळे कॅप्टन, म्हणजेच अशोक खरात, याच्यावरील तिचा विश्वास अधिकच दृढ झाला. त्याच्याकडे 'दैवी शक्ती' असल्याचे त्याने तिला पटवून दिले आणि काही विधी करण्यास भाग पाडले. पीडितेने सांगितले की, त्यानंतर त्याने तिचे शरीर सुन्न करणारे एक मिश्रण प्यायला देऊन तिच्यावर पहिल्यांदा बलात्कार केला. नंतर त्याने तिला धमकी दिली की, जर तिने विरोध केला, तर तिचे लग्न कधीच होऊ शकणार नाही.

त्या स्त्रीचे लग्न झाल्यानंतरही ब्लॅकेल करणे सुरूच ठेवले.

    महिलेच्या लग्नानंतरही कॅप्टन तिला आपल्या जाळ्यात ओढत राहिला. संबंधित महिलेला लग्नानंतर आशीर्वादासाठी कॅनडा कॉर्नर येथील कार्यालयात बोलावले. त्याच पद्धतीने पुन्हा अत्याचार केल्याचा आरोप महिलेने तक्रारीत केला आहे. अशोक खरातने महिलेला धमकी दिली की. "प्रेयसी होऊन शरीरसुख दिले नाहीस तर परमेश्वराचा कोप होऊन, नवऱ्याचा मृत्यू होईल" अशी भीती दाखवली. हे डिसेंबर 2025 पर्यंत सुरू होते. जर तिने त्याच्या लैंगिक मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर तो तिच्या पतीचा मृत्यू होईल, असे सांगू सांगला. पोलिसांनी सांगितले की, त्यांनी त्याच्या मिरगाव येथील घरातून कागदपत्रे, एक पिस्तूल आणि काडतुसे जप्त केली आहेत. कॅप्टनच्या पेन ड्राईव्हमधून काही आक्षेपार्ह क्लिप्ससह एकूण 58 व्हिडिओ जप्त करण्यात आले.