जेएनएन, मुंबई. Ladki Bahin Yojana July Installment: मागील अनेक दिवसांपासून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला ह्या जुलै महिन्याच्या हफ्त्याची वाट पाहत होत्या. त्यांना राज्य सरकारने गुडन्यूज दिली आहे. सरकारने शासन निर्णय जाहीर केला आहे. त्या त्यांनी जुलै महिन्याच्या लाडकी बहीण योजनेच्या हफ्त्यासाठी 344.74 कोटीचा निधी मंजूर केला आहे.
राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना गुडन्यूज दिली आहे. सरकारने जुलै महिन्याच्या लाडकी बहीण योजनेच्या हफ्त्यासाठी शासन निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार त्यांनी 344.74 कोटीचा निधी मंजूर केला आहे.
वित्त विभागाच्या परिपत्रकान्वये सन 2026-27 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे. त्यानुसार “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” योजनेसाठी रु.3000 कोटी इतका नियतव्यय मंजूर आहे. त्यानुसार, सामाजिक न्याय आणि कल्याण विभागामार्फत शासन निर्णय जाहीर (Ladki Bahin Yojana New GR) करण्यात आला आहे.
त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” या योजनेसाठी माहे जुलै, 2026 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्याअनुषंगाने रु.344.74 कोटी इतका निधी वितरीत करण्यासाठीमहिला व बाल विकास विभागाच्या सचिवांना मान्यता प्रदान केली आहे.
344.74 कोटी रुपयांचा निधी मंजूर
जुलै महिन्याचा लाभ हा लाडक्या बहिणींना आतापर्यंत मिळाला नव्हता. त्यांना आता हा लाभ मिळणार आहे. सरकारने 344.74 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत लाडक्या बहिणींच्या खात्यात जुलै महिन्याचे 1500 रुपये जमा होणार आहेत.
रक्षाबंधन पूर्वी खात्यात जमा होणार पैसे (Ladki Bahin Yojana July Installment)
रक्षाबंधन 28 ऑगस्ट रोजी आहे. त्यापूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात हफ्ता जमा होईल असा अंदाज आहे. म्हणजेच येत्या दोन ते तीन दिवसांत लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे वितरीत होण्यास सुरुवात होईल. मात्र, ही रक्कम कधी जमा होणार याबाबत अधिकृत माहित अद्याप देण्यात आलेली नाही.
