जेएनएन, मुंबई. राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana Latest News) ही राज्य सरकारची एक प्रमुख कल्याणकारी योजना आहे, ज्याअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये मदत मिळतात. मात्र, जुलै महिन्यात लाभार्थांना लाभ मिळाले नव्हते. त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. (July Installment Coming)

 “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” योजनेसाठी रु.3000 कोटी इतका नियतव्यय मंजूर आहे. त्यानुसार, सामाजिक न्याय आणि कल्याण विभागामार्फत शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

लाडकी बहीण योजनेचा जुलैचा हफ्ता मंजूर

वित्त विभागाच्या परिपत्रकान्वये सन 2026-27 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे. त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” या योजनेसाठी माहे जुलै, 2026 या महिन्याचा आर्थिक लाभ, अनुसूचित जाती घटकांतर्गत पात्र लाभार्थी महिलांना अदा करण्याअनुषंगाने वाचा शासन निर्णय अधिक्रमित करण्यात आला आहे. त्यासाठी असून, रु.344.74 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव, महिला व बाल विकास विभाग यांना अर्थसंकल्पिय निधी वितरण प्रणालीवर वितरीत करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे.

344.74 कोटी रुपयांचा निधी मंजूर

जुलै महिन्याचा लाभ हा लाडक्या बहिणींना आतापर्यंत मिळाला नव्हता. त्यांना आता हा लाभ मिळणार आहे. सरकारने 344.74 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत लाडक्या बहिणींच्या खात्यात जुलै महिन्याचे 1500 रुपये जमा होणार आहेत. मात्र, ही रक्कम कधी जमा होणार आहे. याबाबत माहिती नाही.