जेएनएन, मुंबई: एखादी व्यक्ती, वस्तू, वास्तू, प्रदेश यांना त्यांच्या नावाने ओळखले जाते. त्याच्या नावामुळेच त्या गोष्टीला महत्त्व प्राप्त होत असते. आज संपूर्ण जगभरात राज्यातील किल्ले धार्मिक महात्म्य आणि संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्राला अनेक वर्षाचा इतिहास आहे परंतु, महाराष्ट्राला हे नाव कसे मिळाले या मागचा इतिहास काय तुम्हाला माहिती आहे का? महाराष्ट्राला त्याचे नाव कसे मिळाले त्याचा इतिहास आपण आजच्या लेखातून जाणून घेऊ या….

साडेतीन हजार वर्षांची परंपरा
महाराष्ट्राला साडेतीन हजार वर्षांची परंपरा आहे. जुन्या वेद पुराणात महाराष्ट्राचा उल्लेख 'दंडकारण्य' म्हणून केला आहे. महाराष्ट्राच्या नावाबाबत बरेच संभ्रम आहेत. बौद्ध धर्माच्या ग्रंथात महाराष्ट्र या शब्दाचा उल्लेख आढळतो. तर ऋग्वेदात महाराष्ट्राला 'राष्ट्र' या नावाने संबोधले गेले आहे. सम्राट अशोकाच्या काळात ''राष्ट्रिक' आणि नंतर महाराष्ट्र या नावाने हा प्रदेश ओळखला जाऊ लागल्याचे पुरावे आढळतात.

तर काही ग्रंथात असे सांगितले गेले की,'महार' आणि 'राष्ट्र' या लोकांची वस्ती असल्याने या प्रदेशाला महाराष्ट्र असे म्हटले गेले. काहींच्या मते हे नाव 'महाकांताकार' म्हणजेच 'वने दंडकारण्य'या शब्दाचा अपभ्रंश आहे. महानुभाव पंथाचे थोर संत चक्रधर स्वामींनी “महन्त् म्हणूनी महाराष्ट्र बोलिजे" अशी व्याख्या केली आहे. छोटे छोटे गोत्र राहत होते ती गोत्रे 'रट्ट म्हणजेच मरहट्ट' आहेत. ही लोक आजूबाजूच्या प्रदेशावर राज्य गाजवू लागले आणि अशीच छोटी छोटी राज्य मिळून महाराष्ट्र तयार झाले असे सांगण्यात येते. तर काहींच्या मते, महाराष्ट्र नावाचे उद्भव संस्कृत शब्द "महाराष्ट्र" आहे, ज्याचा अर्थ होतो "महान राज्य" किंवा "महत्त्वपूर्ण राज्य". हे नाव मुख्यतः इ.स. ३२५ च्या कालातील अशोक यांच्या प्राचीन अशोकावती इ.स. २६४ साली उल्लेखले गेलेले आहे. या नावाचा वापर प्राचीनकाळातील महाराष्ट्र क्षेत्राच्या विविध राज्यांच्या संघटनेसाठी केला जातो.

इतिहासाचे अभ्यासक आणि महाराष्ट्राच्या इतिहासाचा दांडगा अभ्यास असणारे प्राध्यापक प्रदीप चौहान सांगतात की, पहील्या शतकात महाराष्ट्र, मध्यप्रदेश व आंध्रप्रदेश या भागात सातवाहनाचे राज्य होते महाराष्ट्रातील प्रतीष्ठान' म्हणजे सध्याचे पैठण' ही त्याची राजधानी होती, याच काळात 'गाथासप्तशती' हा माहाराष्ट्री प्राकृत भाषेत काव्यग्रंथ रचला गेला. हा सातवाहन राजा त्याचा काळ होता असे मानले जाते. सातवाहनाच्या काळातच भाजे, अजिंठा, जुन्नर, नाशिक, कार्ले, कान्हेरी लेण्याची निर्मिती झाली. या काळात कला व साहित्यास प्रोत्साहन मिळून 'माहाराष्ट्री' या प्राकृत भाषेत विपुल ग्रंथरचना झाली. या वरूनच पुढे या भागाचे नाव "महाराष्ट्र" असे पडले.

महाराष्ट्रातील पहिले राजघराणे
सातवाहनाच्या 30 राजानी इ.स.पू. 230 ते इ.स. 230 असे एकूण 460 वर्ष महाराष्ट्रावर राज्य केले. जागतिक नकाशावर महाराष्ट्रास सर्वप्रथम दर्शविणारे व महत्व प्राप्त करून देणारे सातवाहन हेच पहिले महाराष्ट्रातील राजघराणे होय. असा गौरवशाली ऐतिहासिक वारसा लाभलेला महाराष्ट्राचा इतिहास हा प्राचिन, मध्ययुगीन व आधुनिक काळापर्यंत अविरत सुरु आहे.