जेएनएन, छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये होळीच्या दिवशी एका तरुणाने पोलीस आयुक्तालयाजवळच्या मोबाईल टॉवरवर चढून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तरुण होळीच्या दिवशी दुपारी अचानक मोबाईल टॉवरवर चढला आणि आत्महत्येचा प्रयत्न करू लागला. ही घटना लक्षात येताच नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच सिटी चौक पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तरुणाला खाली उतरवण्याचे प्रयत्न सुरू केले.

पोलिसांनी तरुणाशी संवाद साधून त्याला खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरुण ऐकत नव्हता. असं प्रत्यक्षदर्शांनी सांगितलं. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये तो टॉवरवर चढलेला दिसत असून त्याला खाली आणण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे त्यात दिसत आहे.

हेही वाचा - Maharashtra Crime News: पालघरमध्ये क्रूर हत्याकांड! सूटकेसमध्ये आढळले महिलेचे कापलेले डोके