जेएनएन, पुणे. Pune News: भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या परीसरातीच तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. पुण्यात स्वारगेटनंतरची ही दुसरी घटना असल्याने खळबळ उडाली आहे. 

स्वारगेट स्थानकात शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार झाल्याच्या घटनेनंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. यानंतर पुण्यात पुन्हा एकदा बलात्काराची घटना घडली आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतच तरुणीवर बलात्कार झाला आहे. ओळखीच्या व्यक्तीनेच बलात्कार केल्याची प्राथमिक माहिती पुणे पोलिसानी दिली आहे.

स्वारगेटचे पडसाद अजूनही कायम असतानाच भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका तरुणीवर बलात्काराची घटना घडली आहे. ओळखीचा गैरफायदा घेत तरुणीवर बलात्कार केला.  इतकच नव्हे तर तिला सोशल मीडियातून वारंवार धमकी दिली जात होती असा आरोप ही पीडित तरुणीने केला आहे.

या बलात्कार प्रकरणात भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन मध्ये सिद्धांत रणधीर याच्या विरोधात गुन्हा झाला आहे. या प्रकरणात तक्रार करुन वीस दिवस झाले आहेत. तरीही  पोलिसाकडून आरोपीला अटक करण्यात आली नाही. पीडित तरुणीला आरोपी सोशल मीडियाच्या माध्यमातून वारंवार धमकी देत आहे. तसेच मोबाईल क्रमांकावर अश्लील फोटो सुद्धा आरोपीकडून पाठवण्यात आले आहे, अशी माहिती पीडितने पोलिसाना दिली आहे.