जेएनएन, छत्रपती संभाजीनगर: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज छत्रपती संभाजीनगरात हंबरडा मोर्चा (Hambarda Morcha) काढला. स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या मोर्चाचे नेतृत्व केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी खरडून गेलेल्या जमिनीला मनरेगातून साडेतीन लाख देण्याची घोषणा केली आहे. मी त्यांना आव्हान देतो की, त्यांनी दिवाळीपूर्वी या 3 लाखांपैकी 1 लाख माझ्या शेतकऱ्यांच्या खात्यात टाका, असं आव्हान उद्धव ठाकरेंन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना केले आहे.

शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्याची मागणी

या मोर्चाद्वारे त्यांनी अतिवृष्टीमुळे गलितगात्र झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्यासह त्यांच्या विविध मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली. यासाठी संभाजीनगरसह आसपासच्या अनेक जिल्ह्यांतील शेतकरी व ठाकरे गटाचे कार्यकर्ते संभाजीनगरात एकवटले होते. 

ज्या लोकांनी 50 खोके घेतलेत, त्या लोकांकडे आम्ही हेक्टरी 50 हजार रुपयांची मागणी करत आहोत. हे लोक असे तसे वठणीवर येणार नाहीत. यांच्या पाठीवर आसुड ओढून त्यांना वठणीवर आणावे लागेल, असं टीकास्त्र त्यांनी सोडलं.

सरकारने पॅकेज जाहीर केले. सर्वांना 31 हजार कोटींचे पॅकेज इतिहासातील सर्वात मोठे पॅकेज वाटले. पण प्रत्यक्षात हे पॅकेज इतिहासातील सर्वात मोठी थाप आहे. आजपर्यंत कोणत्याही सरकारने एवढी मोठी थाप मारली नव्हती. पण या देवेंद्र फडणवीस सरकारने इतिहासातील सर्वात मोठी थाप मारली आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. आम्हाला हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत हवी आहे. 

मुख्यमंत्र्यांनी खरडून गेलेल्या जमिनीला मनरेगातून साडेतीन लाख देण्याची घोषणा केली आहे. मी त्यांना आव्हान देतो की, त्यांनी दिवाळीपूर्वी या 3 लाखांपैकी 1 लाख माझ्या शेतकऱ्यांच्या खात्यात टाका. मी राजकारण करत नाही. पण हे सरकार आपली व्यथा मांडणाऱ्या शेतकऱ्यांना राजकारण न करण्याचा सल्ला देऊन त्याचे तोंड गप्प करतात, असेही ते म्हणाले.

    तसंच, उद्धव ठाकरे यांनी नुकतेच झालेल्या पंतप्रधान मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावरही टीका केली. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात राज्यातील शेतकऱ्यांवर एक शब्दही काढला नाही. राज्यात पूरस्थिती असताना पंतप्रधानांनी कोणतीही मोठी घोषणा केली नाही.

    तसंच, पंतप्रधानांनी बिहारमधील महिलांसाठी सुरु केलेल्या योजनेवरुन पंतप्रधानांवर निशाणा साधला. उद्धव ठाकरे म्हणाले, बिहारमध्ये प्रस्ताव नसताना महिलांना 50 हजार रुपये दिले. मात्र, राज्यात नैसर्गित आपत्ती असतानाही पंतप्रधानांनी मदत केली नाही, निवडणूक आली की मदत द्यायची, असं ते म्हणाले.