एजन्सी, छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहरात एक भयकंर घटना समोर आली आहे. मंगळवारी टीसी देण्यावरून झालेल्या वादानंतर एका 17 वर्षीय विद्यार्थ्याने शाळेच्या आवारात एका शिक्षकावर चाकूने हल्ला करून त्याला जखमी केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
शिक्षक विशाल दुशिंग यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचार सुरू होते, तर दुपारी घडलेल्या घटनेनंतर विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आले, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
टीसी प्रमाणपत्रावरून वाद
अल्पवयीन विद्यार्थी 2023 मध्ये नापास झाला होता आणि मंगळवारी तो कँटोन्मेंट परिसरातील शाळेत आपले हस्तांतरण प्रमाणपत्र (ट्रान्सफर सर्टिफिकेट) मागण्यासाठी आला. विद्यार्थ्याच्या तत्कालीन वर्गशिक्षकांना शाळेच्या कार्यालयात बोलावण्यात आले, जिथे दोघांमध्ये वाद झाला, असे त्यांनी सांगितले.
शाब्दिक बाचाबाची सुरू असताना, विद्यार्थ्याने अचानक आपल्या शर्टमध्ये लपवलेला एक धारदार चाकू काढून शिक्षकावर वार केला, ज्यामुळे ते जखमी झाले, अशी माहिती छावणी पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने पत्रकारांना दिली.
