जेएनएन, मुंबई: औरंगाबाद पदवीधर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सतीश चव्हाण यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे.
सतिश चव्हाणांवर पाचव्यांदा जबाबदारी
महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून सतीश चव्हाण यांनी याअगोदर 2008, 2014, 2020, 2026 असे टर्म प्रतिनिधीत्व केलेले असल्याने पुन्हा एकदा पक्षाने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. याबाबतचे अधिकृत पत्र प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी जाहीर केले आहे.

राज्यात पाच ठिकाणी मतदान होणार आहे. त्यापैकी तीन जागांवर भाजपाने आपले उमेदवार दिले आहेत.
पुणे विभाग पदवीधर मतदार संघातून डॉ. स्मिता योगेश जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर नागपूर विभागातील पदवीधर मतदार संघातून सुधाकर विठ्ठलराव कोहळे यांना उमेदवारी दिलेली आहे. तर पुणे विभागातील शिक्षक मतदार संघातून भाजपाने कौस्तुभ मुरलीधर गावडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. आता राष्ट्रवादी कडून सतिश चव्हाण यांना औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
निवडणूक कार्यक्रम
| कार्यक्रम (Events) | दिनांक / वेळ (Dates) |
| नामनिर्देशनपत्र (अर्ज) भरण्याची अंतिम तारीख | 6 ऑक्टोबर, 2026 (मंगळवार) |
| नामनिर्देशनपत्रांची छाननी | 7 ऑक्टोबर, 2026 (बुधवार) |
| उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख | 9 ऑक्टोबर, 2026 (शुक्रवार) |
| मतदानाचा दिवस (Date of Poll) | 23 ऑक्टोबर, 2026 (शुक्रवार) |
| मतदानाची वेळ | सकाळी 8:00 ते दुपारी 4:00 |
| मतमोजणी (Counting of Votes) | 27 ऑक्टोबर, 2026 (मंगळवार) |
| निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख | 31 ऑक्टोबर, 2026 (शनिवार) |
