जेएनएन, मुंबई. भाजपाने महाराष्ट्र विधान परिषद निवडणुका 2026 च्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार घोषित केले आहेत. राज्यात ठिकाणी मतदान होणार आहे. त्यापैकी तीन जागांवर भाजपाने आपले उमेदवार दिले आहेत. 

पुणे विभाग पदवीधर मतदार संघातून डॉ. स्मिता योगेश जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर नागपूर विभागातील पदवीधर मतदार संघातून सुधाकर विठ्ठलराव कोहळे यांना उमेदवारी दिलेली आहे. तर पुणे विभागातील शिक्षक मतदार संघातून भाजपाने कौस्तुभ मुरलीधर गावडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. 

निवडणूक कार्यक्रम

कार्यक्रम (Events)दिनांक / वेळ (Dates)
नामनिर्देशनपत्र (अर्ज) भरण्याची अंतिम तारीख6 ऑक्टोबर, 2026 (मंगळवार)
नामनिर्देशनपत्रांची छाननी7 ऑक्टोबर, 2026 (बुधवार)
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख9 ऑक्टोबर, 2026 (शुक्रवार)
मतदानाचा दिवस (Date of Poll)23 ऑक्टोबर, 2026 (शुक्रवार)
मतदानाची वेळसकाळी 8:00 ते दुपारी 4:00
मतमोजणी (Counting of Votes)27 ऑक्टोबर, 2026  (मंगळवार)
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख31 ऑक्टोबर, 2026 (शनिवार)