जेएनएन, मुंबई. Maharashtra Weather Update News: विदर्भ आणि मराठवाड्यासह मुळसधार पावसाने काल राज्याला झोडपले. आजही राज्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली (Maharashtra heavy rains Warning) आहे. काल पडलेल्या पावसाने राज्यातील तापमानमध्ये मोठी घट झाली आहे. विदर्भ, मराठवाडा उर्वरित महाराष्ट्राला सतर्कतेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

गारपीठीसह वादळी पावसाची शक्यता

आज ही राज्यात अनेक ठिकाणी गारपीठीसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. राज्याचा तापमानमध्ये अंशत: घट नोंद करण्यात आली आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्राला सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

आजपासून तीन दिवस राज्यात पावसाचा इशारा

5 मे च्या रात्रीपासून हवामान बदलण्यास सुरुवात झाली आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. 6 मे ते 9 मे दरम्यान जोरदार वाऱ्यांसह हलका पाऊस पडेल. पुढील दोन दिवसांतही सतत पाऊस पडण्याचा अंदाज आहे ही वर्तविला आहे. या दरम्यान राज्यात जोरदार वारे वाहतील. काही ठिकाणी वादळ आणि गडगडाटसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसांतही सतत पाऊस पडण्याचा अंदाज आहे. 

राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज

    गेल्या दोन दिवसापासून राज्यात ढगाळ वातावरण आहे. राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून काही ठिकाणी वादळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. तर विदर्भ,मराठवाडा, खानदेशमध्ये मध्यम हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. हवामान विभागाने विदर्भासाठी अलर्ट जारी केला आहे. मान्सून पूर्व पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. विदर्भात गारपीठीसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

    पूर्व विदर्भात पुढील 24 तासांमध्ये वादळी पावसाची शक्यता

    केंद्रीय हवामान विभागाने देशभरातील हवामानाचा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये उन्हाची लाट कायम असतानाच विदर्भ आणि नजीकच्या भागांमध्ये अचानक तापमानामध्ये घट झाली आहे. हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार पूर्व विदर्भात पुढील 24 तासांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यात वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. पूर्व भागावर वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे, त्यापासून केरळपर्यंत जाणारी हवेच्या कमी दाबाची रेषा निर्माण झाली आहे. त्यामुळे बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे मोठ्या प्रमाणावर राज्याच्या दिशेने येत आहेत. पुढील चार दिवस मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह राज्यभरात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.