एजन्सी, लातूर: लातूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे अज्ञात व्यक्तींनी एका वृद्ध शेतकरी आणि त्याच्या मुलाची त्यांच्या शेतात निर्घृण हत्या केली, असे पोलिसांनी सांगितले. मंगळवारी अहमदपूर तहसीलमधील रुधडा गावात हे दोघे मृतावस्थेत आढळले.

शेतात गेले होते झोपायला

सोमवारी रात्री 9.30 च्या सुमारास शिवराज निवृत्ती सुरनार (70) आणि त्यांचा मुलगा विश्वनाथ शिवराज सुरनार (20) नेहमीप्रमाणे त्यांच्या शेतात झोपायला गेले होते.

धारदार शस्त्रांनी वार

नंतर, काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या चेहऱ्यावर, मानेवर आणि डोक्यावर धारदार शस्त्रांनी वारंवार वार केले. त्यानंतर हल्लेखोरांनी मृतदेह गावातील पाण्याच्या टाकीजवळ फेकून दिले, असे अहमदपूर पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले.

फॉरेन्सिक तज्ञ घटनास्थळी दाखल

    मंगळवारी सकाळी पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक तज्ञ, श्वान पथक, फिंगरप्रिंट तज्ञ आणि मोबाईल ट्रॅकिंग टीमला पाचारण करण्यात आले होते, असे त्यांनी सांगितले.

    गेल्यावर्षीही झाला होता असाच हल्ला

    त्यानंतर शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षी त्याच गावातील एका वृद्ध जोडप्यावरही असाच हल्ला झाला होता.