जेएनएन,छत्रपती संभाजीनगर: गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडत आहे. मराठवाडा मधील  नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे तडाखा बसला आहे.यामुळे  शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचल्याने जवळपास 4 हजार गावांतील पिकांचा चिखल झाल्याचे चित्र दिसत आहे.

मराठवाड्यात मागील तीन महिन्यांतील अतिवृष्टीमुळे विभागातील तब्बल 3 हजार 919 गावांतील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. यात सोयाबीन, कापूस, मका, तूर, भाजीपाला आदी पिकांचा समावेश आहे. पिके पूर्णपणे चिखलात गाडली गेली आहेत. शेतकरी राज्य सरकारच्या मदतीची वाट पाहत आहे.

शेतकरीवर संकट! 

अतिवृष्टीमुळे साधारण 15 लाख 78 हजार 33 शेतकऱ्यांनी केलेली पेरणी हातातून गेली आहे. मेहनतीने लावलेली पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक शेतकरी आता कर्जबाजारी झाला आहे.

जिल्हावार नुकसान!

नांदेड जिल्हा : सर्वाधिक नुकसान झाले आहे.

    लातूर जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर असून येथे पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

    हिंगोली जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे.

    धाराशिव (उस्मानाबाद) : चौथ्या क्रमांकावर

    या चारही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. काही शेतांमध्ये पाणी साचल्याने पीक वाचवणे अशक्य झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी निराशा पसरली आहे. शेतकरी सरकारच्या मदतीची वाट पाहत आहे.

    हेही वाचा:Anant Chaturdashi 2025 : गणेश विसर्जनासाठी बीएमसी सज्ज; रुग्णवाहिका, क्रेन, मोटरबोटसह 10,000 कर्मचारी तैनात