जेएनएन, नवी दिल्ली. राज्यात जुलै महिन्यात काही ठिकाणी पावसाने चांगली हजेरी लावली. त्यामुळे पिके काहीशी जोमात आली होती. मात्र, ऐन भरणीत (पिंकांच्या फळात रूपांतर होण्याचा काळ) पावसाने दांडी मारली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. 

पिके सुकू लागली

मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे शेतीतील ओलावा कमी झाला असून उन्हाचा चटका वाढल्यामुळे शेतीचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे पिकांनी आता माना टाकायला सुरुवात केली आहे. परभणी जिल्ह्यातील पुर्णा भागात पिके सुकू लागल्याचे चित्र समोर आले आहे. 

ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत केवळ 28.8 टक्के पाऊस

छत्रपती संभाजीनगर विभागात जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पुढील प्रमाणे पाऊस पडला. ऑगस्ट महिन्यात मराठवाड्यामध्ये साधारण 137.2 मिमी पाऊस पडतो. मात्र, यंदा केवळ 39.5 मिमी पाऊस पडला आहे. जो केवळ 28.8 टक्के आहे. म्हणजेच 70 टक्क्यापेक्षा जास्त पावसाची तूट आहे. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

फोटो - उमेश खंदारे (शेतकरी)

मराठवाड्यातील झालेल्या पावसाची आकडेवारी (जिल्हा आणि महिना निहाय, स्रोत - महावेध)

    स्रोत - महावेध

    येत्या पाच दिवसात कसे राहील हवामाम

    IMD Mumbai कडून मराठावाड्यातील एकाही जिल्ह्यात पुढील पाच दिवसांसाठी म्हणजेच 22 ते 26 ऑगस्टच्या दरम्यान कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. या भागात पावसाची शक्यता खूप कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे. पावसाअभावी पिकांना टाकलेल्या माना आणि वाढत्या उन्हामुळे पिकांचे होत असलेले नुकसान (उंची खुंटणे, पातेगळ इ…) ही चिंतेची बाब समोर येत आहे.

    District/ DivisionJuneJuneJuneJulyJulyJulyAugustAugustAugust
    Normal RainfallActual Rainfall% To NormalNormal RainfallActual Rainfall% To NormalNormal RainfallActual Rainfall% To Normal
    छत्रपती संभाजीनगर125.2108.286.4152.2235.0154.4109.143.639.9
    जालना132.6123.793.3166.4249.4149.9115.227.223.6
    बीड128.4116.190.4127.7143.1112.197.914.815.1
    लातूर135.495.370.4186.9144.277.2143.928.920.1
    धाराशीव126.9123.997.6137.1137.1100.0109.631.128.4
    नांदेड155.4123.679.5244.3293.7120.2175.566.738.0
    परभणी145.394.465.0219.2210.496.0161.743.126.7
    हिंगोली169.2120.271.0230.2290.9126.4171.257.833.8
    134.0113.084.3186.2213.5114.7137.239.528.8