एजन्सी, छत्रपती संभाजीनगर. Beed School Holiday: बीड जिल्ह्यातील प्रशासनाने मुसळधार पाऊस आणि पुरामुळे मंगळवारी इयत्ता पहिली ते सातवीच्या शाळा बंद ठेवण्याची घोषणा केली आहे, असे एका अधिकाऱ्याने सोमवारी सांगितले.
जिल्ह्याच्या काही भागात संततधार पाऊस पडत असल्याने, नद्या धोक्याच्या पातळीच्या वर वाहत आहेत, असे ते म्हणाले.
खबरदारीचा उपाय म्हणून, जिल्हा प्रशासनाने मंगळवारी अंगणवाड्या, प्राथमिक आणि माध्यमिक शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
17 सप्टेंबर रोजी होणाऱ्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाची तयारी करणाऱ्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे, असेही अधिकाऱ्याने सांगितले.
बीड जिल्ह्यांत मुसळधार पावसाने थैमान
छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, धाराशीव आणि बीड जिल्ह्यांत मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. जालना जिल्ह्यात आज ढगफुटी (Cloudburst in Jalna) झाली आहे. बीड जिल्ह्यातील सर्व नद्यांना महापूर आला असून तब्बल 32 गावे पुराच्या पाण्यात वेढली गेली आहेत.
बीड आणि छत्रपती संभाजीनगरसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर नांदेड, लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली आणि जालना येथे सोमवारी पिवळा अलर्ट जारी करण्यात आला आहे.