जेएनएन, मुंबई. Aurangzeb Tomb Controversy: गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरून मोठ्या प्रमाणात वाद पेटला आहे. औरंगजेबाची कबर काढून टाकावी, या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने आज राज्यभरात आंदोलन सुरू आहेत.
गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरून मोठ्या प्रमाणात वाद पेटला आहे. 'औरंगजेबाची कबर काढून टाकावी अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती करू", असा इशारा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने दिला होता. याच पार्श्वभूमीवर आज राज्यभरात आंदोलन सुरू आहेत. गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देखील बजरंग दलाकडून आंदोलन करण्यात येत आहे. गोंदिया जिल्ह्यात देखील बजरंग दल कार्यकर्त्यांनी आंदोलन करत औरंगजेब ची कबर हटवण्याची मागणी केली.
बुलढाण्यात निदर्शने
औरंगजेबाची कबर काढून टाकावी, या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने आज राज्यभरात आंदोलन सुरू आहेत. त्या अनुषंगाने बुलढाण्यातील खामगावातील उपविभागीय कार्यालयासमोर बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी सर्व हिंदू समाजाने कारसेवेला जाऊन औरंगजेबाची कबर उध्वस्त करू, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विश्व हिंदू परिषद बजरंग दल हे स्टंटबाजी करतात असे म्हणून अपमान केला याचासुद्धा निषेध आंदोलन कर्त्यांनी केला आहे.
नांदेडमध्ये निदर्शने
औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी नांदेडमध्ये विश्व हिंदू परिषद (VHP) आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.
नांदेड़, महाराष्ट्र: विश्व हिंदू परिषद (वीएचपी) और बजरंग दल के कार्यकर्ताओं ने औरंगजेब की कब्र को हटाने की मांग करते हुए नांदेड़ में विरोध प्रदर्शन किया। pic.twitter.com/duQNT6mAP7
— IANS Hindi (@IANSKhabar) March 17, 2025