जेएनएन, छत्रपती संभाजीनगर: हिंगोलीमध्ये आज सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तिव्रता ही 3.5 मोजण्यात आली आहे. या भूकंपाचे केंद्र हे हिंगोलीत होते, अशी माहिती राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने दिली आहे.

दोन दिवसांत तिसऱ्यांदा भूकंप

गुरुवारी पहाटे दोन भूकंपाचे धक्के येथे जाणवले होते. त्यानंतर आता आज पुन्हा सकाळी 11 वाजून 26 मिनीटांनी 3.5 तिव्रतेच्या भूकंपाचा धक्का या भागात बसला आहे, अशी माहिती भूकंपशास्त्र केंद्राकडून देण्यात आली आहे.

earthquake in Hingoli news
earthquake in Hingoli - हिंगोलीत भूकंपाचे धक्के

यापूर्वी भूकंपाचे धक्के गुरुवारी पहाटे 1.37 ते 3.23 च्या दरम्यान जाणवले आणि त्यांची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.6 ते 4.6 दरम्यान नोंदवण्यात आली.

नागरिकांत घबराट

मागील दोन दिवसांत तीनदा भूकंप झाल्याने नागरिकांत घबराटीचे वातावरण तयार झाले आहे. गुरुवारी येथील नागरिकांनी रात्र बाहेर जागून काढली होती. आजही भूकंपाचा धक्का जाणवल्याने नागरिक घराबाहेर पळाले होते. सतत येत असलेल्या भूकंपामुळे नागरिकांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.