मुंबई : महाराष्ट्रातील मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात गुरुवारी भूकंपाचे धक्के जाणवले.

या भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील शिंदे पांगरा परिसरात असल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास धरती कंपू लागल्याने नागरिक झोपेतून दटकून जागे झाले व घराबाहेर पडले. पहाटेपर्यंत लोक रस्त्यांवर जमाव करून थांबले होते.

नांदेड शहरातील तरोडा नाका, मालेगाव रोड, कावरानगर, निळा रोड यांसह शहराच्या विविध भागांत भूकंपाचे धक्के जाणवले. दरम्यान, भूकंपामुळे कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाल्याचे वृत्त उशिरापर्यंत प्राप्त झाले नव्हते

एका अधिकाऱ्याने सांगितले की, हे भूकंपाचे धक्के पहाटे 1.37 ते 3.23 च्या दरम्यान जाणवले आणि त्यांची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.6 ते 4.6 दरम्यान नोंदवण्यात आली.