मुंबई. मध्य रेल्वेने मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) आणि हजूर साहिब नांदेड दरम्यान नियमितपणे दोन साप्ताहिक एक्सप्रेस ट्रेन सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे.
नवीन गाड्यांचे औपचारिक उद्घाटन 6 जुलै 2026 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उत्तराखंडचे मुख्यमंत्री, केंद्रीय रेल्वेमंत्री आणि इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
नियमित सेवा जुलैपासून सुरू -
पहिली साप्ताहिक सेवा 8 जुलै 2026 रोजी गाडी क्रमांक 17667 हजूर साहिब नांदेड-एलटीटी एक्सप्रेसने सुरू होईल, त्यानंतर 9 जुलै 2026 रोजी गाडी क्रमांक 17668 एलटीटी-हजूर साहिब नांदेड एक्सप्रेस सुरू होईल.
दुसरी साप्ताहिक सेवा 13 जुलै रोजी गाडी क्रमांक 17665 हजूर साहिब नांदेड-एलटीटी एक्सप्रेसने सुरू होईल, तर गाडी क्रमांक 17666 एलटीटी-हजूर साहिब नांदेड एक्सप्रेस १४ जुलै 2026 पासून धावण्यास सुरुवात करेल.
नवीन साप्ताहिक गाड्यांच्या वेळा
गाडी क्रमांक 17668 / 17667 साप्ताहिक एक्सप्रेस
17668 एलटीटी-हजूर साहिब नांदेड एक्सप्रेस 9 जुलैपासून दर गुरुवारी लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सायंकाळी 4.55 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9.10 वाजता हजूर साहिब नांदेड येथे पोहोचेल.
परतीची 17667 हजूर साहिब नांदेड-एलटीटी एक्सप्रेस 8 जुलै पासून दर बुधवारी रात्री 9.15 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 1.00 वाजता मुंबईला पोहोचेल.
थांबे: गाडी कल्याण, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, अकोला, वाशीम, हिंगोली डेक्कन, बसमत आणि पूर्णा येथे थांबेल.
गाडी क्रमांक 17666 / 17665 साप्ताहिक एक्सप्रेस
17666 एलटीटी-हजूर साहिब नांदेड एक्सप्रेस 14 जुलैपासून दर मंगळवारी दुपारी 4.35 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9.10 वाजता नांदेडला पोहोचेल.
17665 हजूर साहिब नांदेड-एलटीटी एक्सप्रेस 13 जुलैपासून दर सोमवारी रात्री 9.15 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 1.40 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल.
थांबे: दुसरी साप्ताहिक गाडी कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला, वाशीम, हिंगोली डेक्कन, बसमत आणि पूर्णा येथे थांबेल.
कोच रचना
दोन्ही गाड्यांमध्ये खालील डबे असतील: 1 एसी फर्स्ट क्लास डबा, 2 एसी टू-टियर डबे, 6 एसी थ्री-टियर डबे, 7 स्लीपर क्लास डबे, 4 जनरल सेकंड क्लास डबे, 1 जनरेटर व्हॅन आणि 1 सेकंड सीटिंग-कम-गार्ड्स ब्रेक व्हॅन.
तिकीट बुकिंग 8 जुलैपासून होणार सुरू-
ट्रेन क्रमांक 17666 आणि 17668 साठी आरक्षण 8 जुलै 2026 रोजी सर्व संगणकीकृत रेल्वे आरक्षण केंद्रांमार्फत सुरू होईल.
प्रवासी आयआरसीटीसी वेबसाइट आणि रेलवन मोबाइल ॲपद्वारे देखील तिकीट बुक करू शकतात. ट्रेनच्या सविस्तर वेळा आणि थेट धावण्याची माहिती नॅशनल ट्रेन एन्क्वायरी सिस्टीम (एनटीईएस) आणि इंडियन रेल्वेच्या चौकशी पोर्टलवर उपलब्ध असेल, असे एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे.
