जेएनएन, बीड: बीड जिल्ह्यातील माजलगाव - खामगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील माजलगाव ते तेलगाव रस्त्यावरील शिंदेवाडी फाट्या जवळ एक भीषण अपघात झाला आहे.

आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास एसटी बस आणि हुंडाई कारची समोरासमोर भीषण धडक झाली. या धडकेत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत हे सर्वजण माजलगाव शहर व परिसरातीलच असल्याची प्राथमिक माहिती समोर आली.

पाचही जणांचा जागीच मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरून बस आणि कार जात असताना शिंदेवाडी फाट्यादरम्यान हा अपघात झाला. धडक इतकी भीषण होती की, कारमधील पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.

तुळजापूर जात होती कार 

मिळालेल्या माहितीनुसार, हे भाविक तुळजापूर देवीच्या दर्शनाला जात होते. या प्रकरणात  रस्ते बांधणी करणाऱ्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

    हेही वाचा - Accident News: 24 तास, 5 भीषण अपघात आणि 45 जणांवर काळाचा घाला; सणासुदीच्या काळात पसरली सर्वत्र शोककळा