जेएनएन, छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उसाने भरलेला भरधाव ट्रक उलटला आहे. या खाली बदल्यानं 4 कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर 13 जण जखमी झाले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
रात्री 12 ते 1 च्या दरम्यान अपघात
जिल्ह्याच्या कन्नड पिशोर रस्त्यावर हा अपघात घडला आहे. रात्री 12 ते 1 च्या दरम्यान ही घटना घडली असल्याचे बोलले जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सध्या पोलीस करत आहे.
ट्रकवर 17 मजूर होते बसलेले
माहितीनुसार, उसाने भरलेल्या ट्रकवर 17 मजूर बसून चालले होते. त्यावेळी अचानक ट्रक पलटी झाला आणि त्यामूळे मजूर उसाखाली दबले. उपस्थितांनी या मजुरांना बाहेर काढत त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केला. त्यातील 13 मजुरांना वाचवण्यात यश आले. मात्र दुर्देवाने यात 4 मजूर ठार झाल्याची माहिती आहे. सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
उसाच्या ढिगाऱ्याखाली अडकले
पिशोर घाटात ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि ट्रक उलटला. त्यामुळे ट्रकवरील कामगार रस्त्यावर पडले आणि उसाच्या ढिगाऱ्याखाली अडकले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. यातील 13 मजूरांना वाचवण्यात आलं आहे. तर चार कामगारांचा मृत्यू झाला आहे. असं पोलिसांनी सांगितलं आहे.