जेएनएन, जालना. Jalna News: जालना शहरात महानगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आहे. आज पाणीवेस ते राजमहल टॉकीज रस्त्यावरील अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात हटवण्यात येत आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक साबळे यांनी दिली आहे.
हेही वाचा - "माझा DNA देखील भारतीय...", जेव्हा इंडोनेशियाई राष्ट्रपतींच्या बोलण्यावर PM मोदी आणि धनखड यांना हसू आवरवेना
आत्महत्येची धमकी
या कारवाई दरम्यान अतिक्रमण हटाव कारवाई रोखण्यासाठी एकाने आत्महत्येची धमकी दिली तसेच हातात चाकू घेऊन स्वत: च्या पोटावर वार करण्याचाही प्रयत्न केला. यावेळी उपस्थित असलेल्या लोकांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला, असं सहाय्यक पोलीस निरीक्षक साबळे यांनी सांगितलं. (Jalna latest News)
हेही वाचा - Chhava Controversy: छावा चित्रपटातील तो वादग्रस्त सीन काढून टाकणार - दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर
परिस्थिती नियंत्रणात
कारवाई वेळी आत्महत्येची धमकी दिली तसेच हातात चाकू घेऊन स्वत: च्या पोटावर वार करण्याचाही प्रयत्न केला. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. आता या भागातील परिस्थिती नियंत्रणात असून पालिका आपली कारवाई करत आहे, अशी माहिती आहे.
हेही वाचा - चिकन खाऊ नका, महाराष्ट्रात बर्ड फ्लूचा शिरकाव, पशुसंवर्धन विभागकडून अनेक जिल्ह्यात रेड अलर्ट जारी
परिसरात पोलिस वाढवले
परिसरात तणाव झाल्यामुळे या भागात पोलिसांची कुमक वाढण्यात आली होती. पालिकेच्या कारवाईत कोणतीही कारवाई येऊ नये. यासाठी या भागात पोलिस तैनात करण्यात आले होते. सध्या परिस्थिती स्थिर आहे.