एजन्सी, लातूर. Latur Crime news: लातूर जिल्ह्यात बाप-लेकीच्या रक्त्याच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. देवणी तालुक्यातील एका गावात 45 वर्षीय बापानेच आपल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

जेवण करुन सगळे झोपले होते.

देवणी तालुक्यात 45 वर्षीय आरोपी आपली पत्नी आणि 14 वर्षांच्या मुलीसह वास्तव्याला आहे. तो मजूर म्हणून काम करतो. मंगळवारी रात्री घरातील सर्वांनी एकत्रित बसून जेवण केलं होतं. जेवणानंतर घरातले 14 वर्षीय पीडित मुलीसह घरातील सगळे झोपी गेले होते.

बापामधील राक्षस झाला जागा 

पीडित मुलगी झोपलेली असताना आरोपी बापामधील राक्षस जागा झाला आणि त्याने यावेळी जबरदस्तीने स्वतःच्या अल्पवयीन मुलीवरच बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पीडितेनं आरडाओरड केली. यानंतर नराधम बापाचं काळं कृत्य समोर आलं आहे. पीडितेचा आवाज ऐकून तिची आई जागी झाली.

    आईने तावडीतून सोडवण्याचा केला प्रयत्न 

    तिच्या आईने तिला त्याच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न केला पण तो तिला मारहाण करून निघून गेला.

    19 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी

    पीडित मुलीच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीवरून, पुरूषाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आणि नंतर त्याला अटक करण्यात आली. स्थानिक न्यायालयाने त्याला 19 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. (Latur Court)