एजन्सी, बीड. बीड जिल्ह्यातील मकोका न्यायालयाने (Beed Court) बुधवारी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येशी संबंधित खंडणी प्रकरणात आरोपी वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
कराडच्या वकिलाची मागणी
सीआयडी कोठडी संपल्यानंतर कराडला व्हिडिओ कॉंन्सफर्न्सद्वारे मकोका प्रकरणांसाठी विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. न्यायालयीन कोठडी दरम्यान कराड याला स्लीप एपनिया आजार आहे. त्यामुळे वाल्मिक कराडला CPAP मशीन देण्याची मागणी वकिलाने केली आहे. तपासी यंत्रणांना तपासासाठी आवश्यक असेल त्यावेळी रिमांडचा अधिकार राखून वाल्मीक कराडला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
मकोका न्यायालयात धाव
कराड याच्यावर 14 जानेवारी रोजी कडक मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्याना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या कोठडीसाठी विशेष मकोका न्यायालयात धाव घेतली.
15 जानेवारी रोजी न्यायालयाने त्यांना या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या सीआयडीच्या विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) कोठडीत 22 जानेवारीपर्यंत पाठवले होते.
हेही वाचा - Accident On Samruddhi Expressway: समृद्धी महामार्गावर पुन्हा मोठा अपघात, महिला जागीच ठार, 6 जण गंभीर
अत्याचार करुन निर्घृण हत्या
बीड जिल्ह्यातील एका पवनचक्की कंपनीकडे पैशांची मागणी करणाऱ्या काही व्यक्तींनी खंडणीच्या बोलीला विरोध केल्याच्या आरोपावरून मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Sarpanch Santosh Deshmukh) यांचे 9 डिसेंबर रोजी अपहरण करुन त्यांच्यावर अत्याचार करुन त्यांची निर्घृण हत्या केली होती.
31 डिसेंबर रोजी पुण्यात पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्यानंतर कराड यांना हत्येशी संबंधित खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली होती.
वाल्मिक कराड मारेकऱ्यांच्या संपर्कात
सरपंच देशमुख यांची हत्या करण्यात आली कारण त्यांना एका ऊर्जा कंपनीकडून 2 कोटी रुपये खंडणी घेण्याच्या योजनेत अडथळा असल्याचे मानले जात होते आणि गुन्ह्या झाला तेव्हा वाल्मिक कराड त्यांच्या मारेकऱ्यांच्या संपर्कात होते, असे महाराष्ट्र पोलिसांच्या एसआयटीने गेल्या आठवड्यात बीड न्यायालयाला (Beed Court) सांगितले.