अहिल्यानगर. Ashok Kharat Wife Kalpana Kharat: भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठा ट्विस्ट समोर आला आहे. अशोक खरातची पत्नी कल्पना खरात हिच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज राहता न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान कल्पना खरातच्या वकिलांनी न्यायालयात केलेला युक्तिवाद लक्षवेधी आणि धक्कादायक ठरला.
काय म्हणाली कल्पना खरात?
न्यायालयात सादर करण्यात आलेल्या बाजूमध्ये कल्पना खरातने स्पष्ट केलं की,
* अशोक खरातच्या कथित गैरव्यवहारांशी तिचा कोणताही संबंध नाही.
* आर्थिक व्यवहार, बनावट खाती किंवा संस्थेतील कामकाजात ती सहभागी नव्हती.
* जे काही केले आहे त्यांच्याशी माझा कुठलाही संबध नाही.
* “मी फक्त पत्नी आहे, व्यवसाय किंवा व्यवहारात माझी भूमिका नव्हती,” असा तिचा दावा होता.
वकिलांचा युक्तिवाद
कल्पना खरातच्या वकिलांनी न्यायालयात सांगितलं की,
* केवळ नातेसंबंधाच्या आधारावर गुन्ह्यात आरोपी करणं योग्य नाही.
* तपास यंत्रणेकडे तिच्याविरुद्ध ठोस पुरावे नाहीत.
* अटक केल्यास तिच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा येईल.
सरकारी पक्षाची भूमिका!
सरकारी वकिलांनी मात्र या युक्तिवादाला विरोध केला.
* प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार मोठ्या प्रमाणावर झाला असून तपास सुरू आहे.
* काही व्यवहारांमध्ये कुटुंबीयांची भूमिकाही तपासण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं.
* त्यामुळे अटकपूर्व जामीन देऊ नये, अशी मागणी करण्यात आली.
न्यायालयाचा निर्णय राखीव!
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे. पुढील सुनावणीत यावर अंतिम निर्णय येणार आहे.
